Share

‘भाई जगताप यांच्यावर प्राण्यांना क्रूर वागणूक दिल्याचा गुन्हा दाखल करा’ ; भाजपची मागणी

Published On: 

मुंबई : केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीविरोधात प्रदेश काँग्रेसच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. प्रदेश अध्यक्ष नाना पटोले देखील या आंदोलनात सहभागी होत आहेत. मुंबई काँग्रेसच्या वतीने देखील इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा विरोध करण्यासाठी बैलगाडीचा वापर करण्यात आला होता. मात्र, बैलगाडीवर चढणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांची संख्या जास्त झाल्याने बैलगाडी तुटली. सुदैवाने या अपघातात कोणालाही ईजा झालेली नाही.

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप या आंदोलनात सहभागी झाले होते. भाई जगपात या बैलगाडीवर उभे राहुन केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देत होते. काँग्रेसचे कार्यकर्ते ‘देश का नेता कैसा हो, राहुल गांधी जैसा हो’ ही घोषणा देत असतांना अचानक बैलगाडी तुटल्याने त्यावरील सर्व नेते खाली कोसळले.

परंतु आता भाजपने याच मुद्याला धरून भाई जगताप यांच्यावर बैलांचा छळ व प्राण्यांना क्रूर वागणूक दिल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. भाजपचे नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी ही मागणी मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. याबात त्यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे.

‘एका बैलगाडीवर जेवढे लोक बसू शकतात त्याच्या चारपट ओझे लादून बैलांचा छळ केल्याबद्दल मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्याविरुद्ध प्राण्यांना क्रूर वागणूक दिल्याचा गुन्हा दाखल करावा, कोरोनाचे नियम धाब्यावर बसवल्याप्रकरणीही कठोर कारवाई करावी अशी माझी मागणी आहे.’ अशा आशयाचे ट्वीट त्यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!