मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे शिवसेनेचे नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांना मंत्रिपद सोडावे लागले होते. पण, त्यांची कामाची पद्धत पाहता त्यांच्यासारख्या नेत्याची गरज आहे, लवकरच ते मंत्रिमंडळात सामील होतील, असे सूचक विधान उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यवतमाळ येथे काल शुक्रवारी केले होते.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड यांच्या विरोधात भाजपने आक्रमक पवित्र घेत त्यांचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेऊन रितसर चौकशी करावी अशी मागणी केली होती. वाढत्या तणावानंतर अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांच्या वनमंत्रिपदाचा राजीनामा घेतला होता. मात्र, आता पुन्हा हेच संजय राठोड हे मंत्रिमंडळात असायला हवे असे सेनेच्या मंत्र्यांना वाटू लागले आहे.
यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘निष्पाप मुलीच्या हत्येचे पाप डोक्यावर असणाऱ्याला पुन्हा मंत्रिपदाचे वेध लागलेत’, अशी टीका त्यांनी केली आहे.
एका माळेचे मणी आणि ओवायला नाही कुणी अशी गत आहे सरकारची
एका निष्पाप मुलीच्या हत्येचं पाप डोक्यावर असणार्याला म्हणे पुन्हा मंत्रीपदाचे वेध लागलेत….
ज्यांनी यावर प्रतिक्रिया दिली त्यांनाही एकदा तपासून घ्याचं…म्हणजे सगळे चट्टेबट्टे कसे एक आहेत हे लक्षात येईल….— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 10, 2021
‘एका माळेचे मणी आणि ओवायला नाही कुणी अशी गत राज्य सरकारची आहे. एका निष्पाप मुलीच्या हत्येचं पाप डोक्यावर असणाऱ्याला म्हणे पुन्हा मंत्रिपदाचे वेध लागलेत. ज्यांनी यावर प्रतिक्रिया दिली त्यांनाही एकदा तपासून घ्याच. जे सगळे चट्टेबट्टे कसे एक आहेत हे लक्षात येईल’ अशी टीका वाघ यांनी केली.
आंदोलन छेडण्याचा चंद्रकांत पाटलांचा इशारा
माजी मंत्री संजय राठोड यांना महाविकास आघाडी सरकारनं पुन्हा मंत्रिमंडळात घेतल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य शासनाला दिला आहे. ‘उद्धव ठाकरे यांनी संजय राठोडांना पुन्हा मंत्रिमंडळात घेऊ नये तसं झाल्यास त्यांनी आंदोलनाला तोंड देण्यासाठी तयार रहावं. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी पुढे काहीच झालं नाही. ही केस हायकोर्टात चालवा, अशी मागणीही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
- ‘दुबार पेरणीचे संकट; शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची भरपाई द्या’, आ.दानवेंची ठाकरे सरकारकडे मागणी
- ‘काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे महाराष्ट्रातील पप्पू!’, चंद्रकांत पाटील यांचा टोला
- ‘तोल सांभाळा! नाहीतर महाराष्ट्रातही काँग्रेस अशीच कोसळेल’, ‘त्या’ घटनेवरून भाजपचा सल्ला
- ‘उस्मानाबाद-तुळजापूर-सोलापूर रेल्वे लाइनचे प्रस्ताव चार टप्प्यांत द्या’, खा.ओमराजेंच्या सूचना
- मंत्री वर्षा गायकवाड यांच्या कारला टेम्पोची धडक, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

