Share

कॅन्सरशी लढला पण वर्ल्ड कप नाही सोडला

Published On: 

मुंबई : भारताने २०११ साली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील २ एप्रिल २०११ ला विश्वचषक जिंकला होता. भारत आणि श्रीलंका यांच्यात विश्वचषकाची अंतिम फेरी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळली गेली होती. भारताने वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेचा पराभव करत दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकला होता. क्रिकेट वर्ल्ड कपच्या इतिहासात प्रथमच एखाद्या संघाने घरच्या मैदानावर चषक उंचावला होता.

अंतिम सामन्यात भारतीय संघाच्या विजयाचे शिल्पकार ठरेल झहीर खान, गौतम गंभीर आणि महेंद्र सिंह धोनी होय. झहीरने गोलंदाजीत तर धोनी आणि गंभीरने फलंदाजीत शानदार कामगिरी करत भारतीय संघाला विजेतेपद मिळवून दिले होते. संपूर्ण मालिकेत युवराज सिंग भारताचा हिरो ठरला. सामन्यातील धोनीचा तो षटकार कोणताही भारतीय चाहता विसरणार नाही. भारताला विजयासाठी ११ चेंडूत ४ धावांची गरज होती आणि धोनीने षटकार मारत वर्ल्ड कप जिंकून दिला होता.

युवराजने भारताला २०११ साली विश्वचषक जिंकवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. पण हा विश्वचषक झाल्यावर युवराजला कॅन्सर झाल्याचे समजले आणि चाहत्यांना एकच धक्का बसला. पण यानंतर युवराज पुन्हा मैदानात परतला. २०११ च्या वनडे विश्वचषकात युवराज मालिकावीराचा मानकरी ठरला होता. त्याने त्या विश्वचषकात ४ सामन्यात सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता. तसेच अंतिम सामन्यात त्याने धोनीबरोबर गंभीर बाद झाल्यानंतर नाबाद ५४ धावांची भागीदारी रचली होती.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!