🕒 1 min read
मुंबई : मराठी अभिनेत्री श्रुती मराठे सोशल मीडियावर चर्चेत असते. जेवढी श्रुतीच्या अभिनयाची चर्चा होते इतकीच तिच्या सौंंदर्याची चर्चा असते. तिने मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही चाहत्यांची मनं जिंकली आहेत. श्रुती इन्स्टाग्रामवर आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच श्रुतीने सोशल मीडीयावर ‘फूल बहारों से निकला’ या गाण्यावर फोटोशूट करत असल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.
https://www.instagram.com/p/CRRjws8Juvx/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again
श्रुतीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक फोटोग्राफर तिचे फोटो क्लिक करताना दिसत आहे. श्रुती साडीमध्ये वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. हा एक सुंदर इन्स्टाग्राम रील आहे. या व्हिडीओमध्ये लोकप्रिय असं ‘फूल बहारों से निकला’ हे गाणंसुद्धा वाजत आहे. हि व्हिडीओ पाहून चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे.
श्रुतीने मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही चाहत्यांची मनं जिंकली आहेत. तमिळ सिनेमा ‘इंदिरा विजहा’ने मधून तिने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. श्रुतीने विविध मराठी, तमिळ चित्रपटात काम केले आहे. साउथमध्ये ती ‘श्रुती प्रकाश’ या नावाने प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या अंदाजातील श्रुतीच्या फोटोंना रसिकांनी कायमच पसंती दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कंगनाच्या चित्रपटात दिसणार नवाजुद्दिन सिद्दिकी; पोस्ट शेअर करत दिली माहिती
- नानांच्या बोलण्याने दोन दिवस राजकारणात गरमी आली, पण काँग्रेस कार्यकर्त्यांत उर्मी आली काय?
- नवख्या इंग्लंडकडुन पाकिस्तानला व्हाईटवॉश; अखेरच्या सामन्यात ३ गडी राखुन विजय
- ‘मुंबईची २०२४ पर्यंतची विजेची गरज लक्षात घेता वीजनिर्मिती तसेच वीजपुरवठ्याचे प्रकल्प गतीने मार्गी लावा’
- स्वबळाचे नारा देणाऱ्या काँग्रेसला पवारांनी फटकारले, कॉंग्रेस नेत्यांना दिला ‘हा’ सूचनावजा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
