बारामती : बारामतीत डिजीटल स्वाक्षरीत सातबारा वाटप उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना अजित पवारांनी बारामतीकरांना मोलाचा सल्ला दिला आहे. शेतकऱ्यांच्या घराघरातील वादाचं मूळ हे जमीन असल्याचं सांगितलं. त्यामुळे वाद करत बसू नका, तुम्हाला कोर्टात जाईपर्यंत सगळे गोड बोलतील. नंतर त्रास होईल. त्यामुळं कोर्टाची पायरी चढू नका, असा मोलाचा सल्ला अजित पवार यांनी दिला आहे.
‘सद्यस्थितीत जमीन ही घराघरातील वादाचे मूळ आहे. हे वाद कायमस्वरुपी मिटावेत अशी आमची भूमिका आहे. त्यामुळेच विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत. मात्र बाबांनो कोर्टाची पायरी चढू नका’, असा मौलिक सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.
आमच्या लहानपणी तलाठी अर्थात भाऊसाहेबांचाच थाट असायचा. त्याकाळी काहींनी कुणाच्याही जमिनी कुणाच्याही नावावर करण्याचे उद्योग केल्या, असं म्हणत अजित पवारांनी तो किस्सा यावेळी सांगितला.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी सिंहगडाची पाहणी केली. ‘माझा सिंहगड माझा अभिमान’ या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. सिंहगडावर ट्राफिक होतं. ‘इलेक्ट्रिक बसचा पर्याय, आज पीएमटीच्या ट्रायल बसने आज आम्ही आलो. येथे वेगवेगळ्या टपऱ्या आहेत. कुणीही कशाही पद्धतीने टपऱ्या लावल्या आहेत. त्यामुळे बकालपणा आलाय, आम्हाला त्यांच्या रोजी रोटीवर परिणाम होऊ द्यायचा नाही. त्यांच्यावर अन्याय होऊ द्यायचा नाही. सध्या 71 स्टॉल्स आहेत. पण चांगल्या प्रकारे कसं करता येईल यासाठी प्रयत्न करू’, असे अजित पवार यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- मला अजित दादांना राज्याच्या मुख्यमंत्री पदी बसलेलं बघायचंय – अमोल कोल्हे
- धर्मांतरण प्रकरणात उत्तर प्रदेश ATS ने केली यवतमाळच्या धीरज जगतापला अटक
- वराती मागून घोडे नाचवून काहीच उपयोग नाही; दरेकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी झाला खुला, पर्यटकांनी भरभरून दिला प्रतिसाद
- ‘शरद पवारांना पंतप्रधान करण्यासाठी कामाला लागा;त्यांना पुण्यात गुंतवून ठेवू नका’


