मुंबई : मुंबईतील साकीनाका येथील मन विषन्न करणाऱ्या घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली आहे. साकीनाका येथील एका 32 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या अत्याचारानंतर महिलेला अमानुषपणे मारहाण देखील करण्यात आली होती. दुर्दैवाने आता या महिलेचा मृत्यू झाला असून या भयंकर घटनेमुळे सर्वच क्षेत्रातून संताप व्यक्त केला जात आहे.
आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशा प्रकरणांना वेळीच आळा घालण्यासाठी व आरोपीला कडक शिक्षा व्हावी यासाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. ‘साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. यासंदर्भात मी राज्याच्या गृहमंत्र्यांशी देखील बोललो आहे. खटला फास्ट ट्रॅक चालवला जाईल,’ असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी या घटनेविषयी संपूर्ण माहिती घेतली असून पोलीस आयुक्तांशी देखील ते बोलले आहेत. झालेली घटना निंदनीय आहे. हे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारास कठोरात कठोर शासन केले जाईल. यासंदर्भातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी तातडीने तपासाला गती देण्याचे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितलं आहे.
अमानवी कृत्य; महाराष्ट्राची मान शरमेने झुकली !
साकीनाका येथील पीडित महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला. गेल्या आठवड्याभरात अवघ्या ६ वर्षांच्या चिमुकलीपासून ते महिलांपर्यंत अत्याचार, बलात्कार अशा घटनांमध्ये वाढ झाली असून राज्यात अशा अमानवी कृत्य करणाऱ्या नराधमांना धाक राहिल्याचे दिसून येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- महेबूब शेख यांच्या गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन जयंत पाटील यांच्या संमतीनेच ?
- रुग्णालयात नर्सच्या वेशात आली आणि बाळ पळवून गेली; पोलिसांनी ‘असा’ लावला छडा
- ‘अत्याचाराच्या घटना सुरूच, सावित्रीच्या लेकींची फरफट कुठपर्यंत?’
- साकीनाका बलात्कार प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालविणार- नवाब मलिक
- ‘सरकारमध्येच महिलांची पिळवणूक करणारे बसलेत, मग गुन्हेगारांना धाक कसा असेल?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

