Share

‘अत्याचाराच्या घटना सुरूच, सावित्रीच्या लेकींची फरफट कुठपर्यंत?’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. साकीनाका येथील प्रकरणामुळे राज्यभरात हळहळ होत असताना अमरावतीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दर्यापूर तालुक्यातील येवदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका नराधमानं अल्पवयीन मुलीवर बळजबरी केली. यानंतर ती मुलगी गर्भवती राहिली. अखेर ६ महिन्यांची गर्भवती असताना भीतीपोटी पीडितने गळफास घेत आत्महत्या केली आहे. येवदा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

या गंभीर प्रकारामुळे राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनीही यावरून आपल्या भावना व्यक्त केल्यात. ‘अमरावतीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडित मुलगी ७ महिन्यांची गर्भवती, भीतीपोटी पीडितेने गळफास लावून संपवली जीवनयात्रा…. निशब्द आहे मी. अत्याचाराच्या घटना संपतचं नाहीयेत. रोजचं सुरू आहे. सावित्रीच्या लेकींची फरफट कुठपर्यंत? असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारला आहे.

दरम्यान, पीडितेच्या आई-वडिलांनी शुक्रवारी येवदा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस सध्या याप्रकरणी तपास करत आहेत. पीडितेवर गेल्या नऊ महिन्यांपासून अत्याचार सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे. येवदा पोलिसांनी या नराधमास ताब्यात घेतले आहे. तर, पोस्को अंतर्गत गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहे.

चित्रा वाघ यांना भावना अनावर

मुंबईच्या साकीनाका परिसरात झालेल्या अत्याचार प्रकरणातील पीडितेची आज मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. या पार्श्वभूमीवर सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया येत असताना चित्रा वाघ यांनी राजावाडी रुग्णालयात मृत महिलेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यानंतर चित्रा वाघ यांनी संतप्त शब्दांमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी वाघ यांना भावना अनावर झाल्या. ‘आम्ही यात काहीही करू शकलो नाही. आम्ही भाषणं देण्यापलीकडे, घोषणा देण्यापलीकडे काहीही करू शकलो नाहीत. ही हार आहे आमची आणि याचंच मला दु:ख आहे’, असं चित्रा वाघ यावेळी म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!