Share

लॉकडाऊनसारखी कठीण परिस्थिती पुन्हा उद्भवल्यास शेतकऱ्यांना अडचणी येऊ देणार नाही; खोतकर

Published On: 

जालना : लॉकडाऊनसारखी कठीण परिस्थिती पुन्हा निर्माण झाली तरी शेतकऱ्यांना अडचणी येऊ देणार नाही, अशी ग्वाही शिवसेना नेते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन खोतकर यांनी दिली आहे. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी सभापती अर्जून खोतकर यांच्या नेतृत्वात पार पडली. यावेळी ते बोलत होते.

कोरोनामुळे गेल्या वर्षी संपर्ण देशासह जगभरात भितीचे वातावरण होते. अशा परिस्थितीतही आपण केलेल्या आवाहनानंतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जिवावर उदार होऊन शेतमाल खरेदी-विक्रीची प्रक्रिया सुरू ठेवली. त्यामुळेच कठीण काळातही शेतकऱ्यांच्या पदरात दोन पैसे मिळाले. आता पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय. त्यामुळं लॉकडाऊनसारखी कठीण परिस्थिती पुन्हा निर्माण झाली, तरी शेतकऱ्यांना अडचणी येऊ देणार नाही, अशी ग्वाही सभापती अर्जुन खोतकर यांनी दिली आहे.

पुढे बोलताना खोतकर म्हणाले, सध्या कोविडचा संसर्ग हा गुणाकार पद्धतीने वाढत आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्यावी. ग्रामीण भागात देखील कोविडचे रुग्ण वाढत आहेत. लस जरी आली असली तरीही कोरोनाचे स्वरूप बदलल्याने काळजी घेण्याचं आवाहन यावेळी खोतकर यांनी केले. तसेच, आगामी काळात लॉकडाऊनसारखी परिस्थिती उद्भवल्यास बाजार समिती शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असा विश्वास खोतकर यांनी शेतकऱ्यांना दिला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!