Share

शेतकरी मागे हटणार नाहीत; सरकारलाच माघार घ्यावी लागेल : राहुल गांधी

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर निशाणा साधला. “सरकार या समस्येचं निराकरण का करत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की ऑफर टेबलवर आहे. हा कायदा दोन वर्षांसाठी थांबवला जाऊ शकतो. या समस्येचं निराकरण केलं गेलं पाहिजे. मी शेतकऱ्यांना चांगलं ओळखतो. ते मागे हटणार नाहीत, सरकारलाच मागे हटावं लागेल,”असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं आहे.

यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलन, तसंच अर्थसंकल्पावर भाष्य करत सरकारवर टीकेचा बाण सोडला. शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी यावर लवकरच तोडगा काढण्यात आला पाहिजे असं मत व्यक्त केलं. शेतकरी हा देशाचा कणा आहेत आणि सरकार त्यांच्यावर अत्याचार करत असल्याची टीकाही राहुल गांधी यांनी केली.

“सरकार शेतकऱ्यांना घाबरवण्याचं, धमकावण्याचं काम हे सरकारचं नाही. शेतकऱ्यांशी चर्चा करून त्याचं निराकरण करणं हे त्यांचं काम आहे, सरकार शेतकऱ्यांशी चर्चा का करत नाही. ही समस्या आपल्या देशासाठी चांगली नाही. शेतकरी कुठेच जात नाहीत,” असंही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!