उस्मानाबाद : गेल्या १० दिवसात सलग पाऊस पडतोय. या सलग पडणाऱ्या पावसाने नुकसानीचे स्वरूप रोज बदलत चाललय. तरीपण नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून सुटणार नाही. त्याला महाविकास आघाडी सरकारकडून मदत करण्यात येईल. असे आश्वासन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहे. महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगत, त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. धनंजय मुंडे हे उस्मानाबाद जिल्ह्यातील तडवळा येथील कार्यक्रमात बोलत होते.
मुंडे म्हणाले की, ‘शेतकऱ्यांचा उभा ऊस आडवा झाला आहे. तसेच कापूस भिजला आहे, पाण्यातल्या सोयाबीनच कसं होईल? असा मला प्रश्न पडला आहे. राज्यातील कोणत्याही मंत्र्याने आजपर्यंत ४ वेळा नुकसान पाहणी दौरा केला नसेल पण आम्ही केला आहे. झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना मदत मिळणारच आहे, तसेच विमा मिळणारच आहे, ही आम्ही जबाबदारी घेतली आहे. शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाहीत. तुम्ही फक्त धीर खचू देऊ नका महाविकास आघाडी सरकार आपल्या पाठीशी आहे.’
ज्या ज्या वेळी शेतकऱ्यांवर संकट आले तेव्हा पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष धावून आला आहे. आजही या संकटात आपण स्वतः ला एकटं समजू नका पवार साहेब आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत. अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- आर्यन खानला दिलासा नाहीच; न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला
- ‘..तर राष्ट्रवादी स्वबळावरही निवडणूक लढवू शकते’, शरद पवारांकडून मित्रपक्षांना कानपिचक्या
- सर्वधर्मीय धार्मिक स्थळांना भेटी देऊन मंत्री छगन भुजबळ यांची कोरोनामुक्तीसाठी प्रार्थना
- कोळसाटंचाईमुळे वीजनिर्मितीवर परिणाम; विजेचा अनावश्यक वापर टाळण्याचे महावितारांचे आवाहन
- … तर एकही चेंडू न खेळता मुंबई इंडियन्स आयपीएलमधून पडू शकते बाहेर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

