जालना : शेतकऱ्यांनी आपला आर्थिक स्तर उंचावण्यासाठी रेशीम उद्योगाकडे वळावं, असं आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. जालन्यात रेशीम कोष बाजारपेठेच्या नियोजित इमारतीचं भूमीपूजन काल दानवे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यावेळी उपस्थित होते.
रेशीम अळी विकत घेण्यासाठी शेतकऱ्यांना एक हजार रुपये तसंच रेशीम कोष विक्रीसाठी प्रतिकिलो ५० रुपये अनुदान देण्याची घोषणा राज्यमंत्री खोतकर यांनी यावेळी केली. मराठवाड्यात रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी उपसंचालक कार्यालयाची स्थापना करण्यात येणार असल्याचं खोतकर यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या
विटंबना सत्र सुरूचं, पुण्यात पंतप्रधान मोदींच्या फ्लेक्सवर लावण्यात आलं शेण
शिवसेनेला विश्वासात घेतल्यानंतरचं राणेंच्या प्रवेशावर निर्णय घेणार : मुख्यमंत्री
‘भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांसाठी मुख्यमंत्र्यांकडे वॉशिंग पावडर आहे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

