हिंगोली : देशात कांद्याचा तुटवडा भासू नये म्हणून केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यात बंदी शेतकऱ्यांवर लादली आणि लॉकडाऊन, ओला दुष्काळ, कीड यासारख्या संकटांना सामोरा जाणारा शेतकरी पुरता दबून गेला. कांद्याला सुगीचे दिवस आले असताना केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सुरुवातीला लाखो टन कांदा सीमाभागात तर अडकलाच आणि देशासह राज्यातील कांद्याचा भाव देखील कोसळला.
तर, विदर्भासह मराठवाड्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. शेतात पाणी साचल्यामुळं हाताशी आलेली पिकं कुजली आहेत. अतिवृष्टीमुळे अनेक नद्यांना पूर आल्याने नदी लगतची शेतीच वाहून गेल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे शेतकरी हवाल दिल झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी हिंगोली जिल्ह्यातील स्थितीची पाहणी केली आहे. हिंगोलीमध्ये काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे सोयाबीन, कापूस, तुर, उडीद, मूग, ऊस व इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. भुसे यांनी औंढा नागनाथ तालुक्यातील हिवरा जाटु, नागेशवाडी या भागात पिक पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शेतकऱ्यांनो काळजी करू नका, सरकार तुमच्या पाठीशी आहे अस आवाहन देखील त्यांनी शेतकरी बांधवांना यावेळी केलं.
आज हिंगोली जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात कृषीविषयक योजनांची व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त पिक संदर्भात आढावा बैठक घेतली.
यावेळी, MP हेमंत पाटील, MLA संतोष बंगर, MLA तानाजी मुठकुळे, DC रुचेश जयवंशी उपस्थित होते.@CMOMaharashtra @AUThackeray @MahaDGIPR pic.twitter.com/DlgNarbOUR— Dadaji Bhuse (@dadajibhuse) September 27, 2020
महत्वाच्या बातम्या :-
- कोव्हिड सेंटरमध्ये लज्जास्पद प्रकार, मुलींच्या वसतिगृहाची रुग्णांनीच केली नासधूस; वाचा काय आहे ‘हा’ प्रकार
- बॉलिवूडमधील ड्रग्ज घेणाऱ्यांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही – आठवले
- पुन्हा भाजप विरुद्ध महाविकास आघाडी; ‘या’ निवडणूकीसाठी आमनेसामने येणार
- मोठी बातमी : राऊत-फडणवीसांच्या भेटीनंतर शरद पवार उद्धव ठाकरेंच्या भेटीला
- …आता रकूल प्रीतची दिल्ली हाय कोर्टाकडे धाव


