Share

आष्टी तालुक्यातील क्रीडा संकुलचे रखडलेले काम होणार पूर्ण; उभारणीसाठी पाच कोटी मंजूर

Published On: 

बीड: जागेच्या किरकोळ अडचणीमुळे आष्टी येथील क्रीडा संकुलचे काम रेंगाळत पडले असून, सर्वांना बरोबर घेऊन हा प्रश्न आपण येत्या काही दिवसात मार्गी लाावणार असून पाच कोटी रूपये निधीतून क्रीडा संकुल पूर्णत्वास नेणार आहोत, अशी माहिती आमदार आजबे यांनी दिली. जिल्हा क्रीडा अधिकारी व तालुका क्रीडा अधिकारी यांना तात्काळ प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचनाही दिल्याचे आमदार बाळासाहेब आजबेंनी दिल्या आहे.

आष्टी येथील तहसील कार्यालय सोमवारी आयोजित एका बैठकीत आमदार आजबे बोलत होते. तहसीलदार राजाभाऊ कदम, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, पोलीस निरीक्षक सलीम चाऊस व इतर आधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी आजबे बोलताना म्हणाले, क्रीडासंकुलासाठी ज्या ठिकाणी वादग्रस्त जागा असतील त्या जागा सोडून इतर जागेवर काम सुरू करण्यास हरकत नाही. शासनाच्या जागेवर अतिक्रमण झाल्याने अनेक योजना राबवताना अडचणी निर्माण होत आहेत.त्यामुळे तालुका प्रशासनाने अतिक्रमणे होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.

आष्टी व पाटोदा तालुक्यात समाज कल्याण विभागाचे मागासवर्गीय वसतीगृह व ऊसतोड कामगारांच्या मुलांचे वसतीगृह मंजूर असून संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यासाठी जागा निश्चित करण्यात येणार आहे. तसेच लोकप्रतिनिधींनी सांगितलेली कामे जर का चुकीचे असतील तर त्या चुका संबंधित अधिकाऱ्यांनी लक्षात आणून देणे गरजेचे असून, चुकीची कामे करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण होणार नाही याची दक्षता अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!