मुंबई : टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा हे त्यांच्या दानशूरतेसाठी प्रसिद्ध आहेत.एवढे मोठे व्यावसायिक आणि देशातील मोठे व्यापारी असतानाही रतन टाटा सामान्य माणसासारखं जीवन व्यतित करत आहेत. काम ही सर्वात मोठी पूजा असल्याचंही रतन टाटांचं म्हणणं आहे. जर आपण कोणतंही काम नियमांच्या अधीन राहून करत असल्यास आपल्यालाही यश मिळण्यास वेळ लागेल. पण यश मिळेलच याची निश्चित खात्री आहे.
टाटा ग्रुपचा व्यवसाय एवढा मोठा असूनही त्यांची कंपनी टाटा एक ट्रस्टसारखं काम करते. त्यामुळेच ती मुकेश अंबानी आणि दुसऱ्या श्रीमंतांच्या फोर्ब्स लिस्टमध्ये समाविष्ट नाही. रतन टाटा हे त्यांच्या दानशूर व्यक्तिमत्वामुळे कायमच चर्चेत असतात. कोरोना काळात देखील त्यांनी देशासाठी भरभरून मदत केली. देशाबद्दल जे जे काही करता येईल त्यासाठी ते पुढाकार घेत असतात. त्यामुळे त्यांची नेहमीच चर्चा होत असते. आता आणखी एका कारणामुळे सध्या त्याची चर्चा सुरु झाली आहे.
रतन टाटा यांचे प्राणीप्रेम जगजाहीर आहे. खास करुन त्यांचे श्वानांवर अधिक जीव आहे. बऱ्याचदा रतन टाटा बेवारस श्वानांना स्वत:चे हक्काचे प्रेमाचे घर मिळवून देण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असतात. यात रतन टाटांनी स्प्राईट नावाच्या एका बेवारस श्वानाला हक्काचे घर मिळाल्याची यशस्वी स्टोरी पोस्ट केली आहे.
https://www.instagram.com/p/CIr8ZBwHk_m/?utm_source=ig_web_copy_link
रतन टाटांनी डिसेंबर २०२० रोजी या श्वानाला दत्तक घेण्याचे आवाहन एका इंस्ट्राग्राम स्टोरीच्या माध्यमातून केले होते. स्प्राईटसाठी एक प्रेमळ कुटुंबिय शोधण्यासाठी मला पुन्हा मदत करा अशी विनंती आपणास करतो. या श्वानाचा मागचा एक पाय दुर्घटनाग्रस्त झाला आहे. अशी पोस्ट रतन टाटांनी केली होती.
या स्टोरीतील स्प्राईट आता पूर्णपणे ठीक झाला आहे. यावरच आज रतन टाटांनी इंस्टाग्रामवर नवीन तीन पोस्ट शेअर करत स्प्राईटला दयाळू व्यक्तींनी दत्तक घेतल्याचे सांगितले आहेत. यावर त्यांनी व्हिडिओ पोस्ट करत लिहिले की, तुम्हाला स्प्राईट आठवत असेल ज्या अपंग श्वानाला घराची गरज होती. स्प्राईटला हक्काचे प्रेमळ घर मिळवून दिल्याबद्दल रतन टाटांनी अॅनिमल गार्डियंस मुंबई आणि अॅनिमल रेस्क्यूअर कावेरी भारद्वाज यांना धन्यवाद दिले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- शिवसेनेला भाजपची भीती वाटतेय की मित्रपक्षांवर भरोसा नाही ?
- रावसाहेब दानवेंच्या कार्यालयाची झाडाझडती, दोन अधिकाऱ्यांसह पाच पोलीस निलंबित
- WTC चा अंतिम सामना जिंकणाऱ्या टीमला मिळणार ‘एवढी’ रक्कम
- ‘या’ ठिकाणी दुसऱ्यांदा अतिक्रमणाचा प्रयत्न, मनपाच्या अतिक्रमण विभागाने हाणून पाडला!
- इशांत का सिराज, ‘विराट’प्रश्न ; सराव सामन्यात मिळालं उत्तर
- ‘धर्माच्या भावनांशी खेळू नका’; राम मंदिर घोटाळ्याच्या आरोपांवर शिवसेना खासदाराचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

