Share

दिलदार शेतकरी ! कोविड सेंटरसाठी शासनाला विनामोबदला शेती द्यायला तयार

Published On: 

नांदेड : राज्यभरात कोरोनाने थैमान घातले आहे. दवाखान्यात जागा नसल्याने रुगांना उपचाराअभावी आपला प्राण सोडवा लागत आहे. अशात राज्यातील आरोग्य व्यवस्था अक्षरशः उघडी पडली आहे. आरोग्य व्य्स्वस्था आणि शासनावर प्रचंड ताण येत आहे. दवाखाने पूर्ण भरले आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जास्तीत जास्त कोविड सेंटर उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

यासाठी अनेक सामाजिक संस्था आणि संघटना पुढे येत आहेत. आता एका शेतकऱ्याने थेट आपली शेतीच कोविड सेंटरसाठी प्रशासनाला विनामोबदला देण्याची तयारी दाखवली आहे. नांदेड शहरापासून 14 किमी अंतरावर स्वप्नील सूर्यवंशी यांची शेती आहे. आपली ही शेती आपण प्रशासनाला कोविड सेंटरसाठी विना मोबदला देण्यास तयार असल्याचं स्वप्नील यांनी ट्विटर अकाऊंटवरुन म्हटलं आहे. स्वप्नील हे नांदेश शहर संभाजी ब्रिगेडचे अध्यक्षही आहेत. त्यांच्या या ट्विटनंतर अनेकांनी त्यांच्या निर्णयाचं कौतुक केलंय.

https://twitter.com/lucky_swapnil/status/1384190459304501252?s=20

दरम्यान, गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यात दिवसाल ६० हजारांपेक्षा जास्त बाधित आढळून येत आहेत. त्यातच, ऑक्सिजन, रेमेडीसीवीर इंजेक्शन आणि इतर वैद्यकीय यंत्रणा तोकडी पडत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र, अद्यापही कोरोनाची संख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे, राज्यात कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!