Share

‘औसा येथील शेतकऱ्यांनी केशर आंब्याची लागवड करावी’- आ. पवार

Published On: 

लातूर: जिल्ह्यातील औसा तालुक्यात केशर आंब्याची झाडे पोसण्यासाठी पोषक वातावरण असून केशर आंब्याला देशभरात मागणी आहे. सतत काहीतरी नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांना पर्यायी म्हणून फळलागवड हा चांगला पर्याय असून यासाठी शासन अनुदान देत असून केशर आंब्याला जागतिक बाजारपेठे देण्याची जबाबदारी माझी असून केशर आंबा लागवडीसाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आ. अभिमन्यू पवार यांनी केले आहे.

तालुक्यात केसर अंब्याचे उत्पादन शेतकऱ्यांनी जास्त प्रमाणात करावे कारण याची लागवड सध्या शेतकरी कमी प्रमाणात करत असून आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत अंब्याची जास्त मागणी असल्याने केसर अंब्याला जास्त भाव मीळत आहे. शेतकऱ्यानी गावनिहाय ५० एकरतरी केसर अंब्याची लागवड करावी, असा सल्ला देखील या वेळी आ. पवार यांनी शेतकऱ्यांना दिला.

दरम्यान यावेळी शेती अभ्यासकांनी मार्गदर्शन केले, प्रत्येक गावात किमान ५० एकरवर फळबाग लागवड करण्याचे उद्दिष्ट असून त्या अनुषंगाने कामाचे नियोजन केले जात आहे. गेल्या काही वर्षापासून मरगळ आलेल्या या योजनेला आ. अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नाने नवी उभारी आली असून त्यांनी या योजनेला या दौऱ्याच्या माध्यमातून गती देण्याचे काम केले आहे. या प्रयत्नाला शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यास खऱ्या अर्थाने ही योजना यशस्वी होईल, असा विश्वास जिल्हा कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!