Share

कृषी कायद्याच्या समर्थनासाठी ६ डिसेंबरला शेतकरी एल्गार; सदाभाऊ खोत यांची घोषणा!

Published On: 

🕒 1 min read

नाशिक:- केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरुद्ध दिल्लीच्या सीमेवर गेल्या ९ दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. मात्र आता शेतकरी नेते सदाभाऊ खोत हे केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याच्या समर्थनासाठी रस्त्यावर उतरत आहेत. कृषी कायद्याच्या समर्थनात ६ डिसेंबरला शेतकरी एल्गार होणार असल्याची घोषणा खोत यांनी केली आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरुद्ध दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी कालच राज्यातील शेतकरी संघटनांनी जागोजागी आंदोलन केले होते.

मुंबईतील आझाद मैदानावर हे आंदोलन होणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारनं मंजूर केलेल्या शेतकरी कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली आहे. प्रत्येक शेतकऱ्याला आपला शेतमाल कुणालाही, कुठेही विकण्याचा अधिकार आहे. दिल्लीत सुरु असलेलं आंदोलन हे शेतकऱ्यांची दिशाभूल करणारं असल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी केलाय.

शरद जोशी यांना अभिप्रेत असलेलं हे कृषी बिल असल्याचं सदाभाऊ यांनी म्हटले आहे. मार्केट कमिटी आणि दलालांसाठी बांडगुळ म्हणून काम करणारे मूठभर लोक या कायद्याला विरोध करत असल्याचं म्हणत सदाभाऊंनी राजू शेट्टींवर निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांना शेतमाल विकण्याची स्वतंत्र व्यवस्था उभारली दिली जाऊ नये हा काही राजकारण्यांचा स्वार्थ आहे, असे खोत यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!