🕒 1 min read
मुंबई : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा आज 20 वा दिवस आहे. आता लवकरच या आंदोलनावर तोडगा निघू शकतो, अशी शक्यता वर्तवली आज आहे. मात्र, 19 दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनाने आता आक्रमक स्वरूप धारण केले आहे. या मुद्यावरून सामना अग्रलेखातून मोदी सरकारला टोला लगावला आहे.
या सरकारचे धोरण नको तेथे बोलायचे आणि हवे तेथे ‘हाताची घडी तोंडावर बोट’ ठेवायचे असेच राहिले आहे. ज्या शेतकरी कायद्यांवरून देशातील शेतकरीवर्गात अंगार पेटला आहे त्याबाबत सरकार काहीच बोलत नाही. पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबतही ‘सरकार काही बोलत नाही आणि भाववाढ थांबत नाही’, असेच सुरू आहे. त्यामुळे तिकडे शेतकरी आंदोलनाची ‘धार’ वाढत आहे आणि इकडे इंधन दरवाढीचा मार पडत आहे. दिल्लीत शेतकरी आंदोलनाचा वणवा पेटला आहे. देशात इंधन दरवाढीचा ‘भडका’ उडाला आहे. हा ‘वणवा’ आणि ‘भडका’ वेळीच शांत करणे केंद्रातील सरकारच्याच हिताचे आहे. असे म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
देशातील कोरोनाचा कहर तुलनेने कमी झाला असला, तरी इंधन दरवाढीचा कहर मात्र आटोक्यात येण्याची चिन्हे नाहीत. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकार, प्रशासनाबरोबरच लोकांनीही बरोबरीची जबाबदारी निभावली. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवर नियंत्रण ही मात्र सरकारचीच जबाबदारी आहे. ती पाळली जात नसल्याने पेट्रोल-डिझेलचे दर वाढतच चालले आहेत. त्यात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या आहेत. त्यामुळे ही दरवाढ लवकर नियंत्रणात येण्याची शक्यताही दिसत नाही. पेट्रोलचे दर सध्या प्रतिलिटर नव्वदीपार गेले आहेत, तर डिझेलने 80 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
गेल्या आठवड्यात सलग सहा दिवस ही दरवाढ होत होती. तीन दिवसांपूर्वी तिला थोडा ब्रेक लागला होता खरा, पण आता जागतिक बाजारपेठेची परिस्थिती बदलल्याने ही दरवाढ पुन्हा होण्याची भीती निर्माण झाली आहे. कच्च्या तेलाचा आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव प्रतिबॅरल 50 डॉलर्सच्या वर गेला आहे. मार्चनंतरचा हा सर्वाधिक दर आहे. तो आणखी वाढला तर आपल्या देशात इंधन दरवाढीचा आणखी भडका होऊ शकतो. गेल्या दीड महिन्यात कच्च्या तेलाच्या किमती तब्बल 28 टक्क्यांनी वाढल्याने आपल्या देशात 20 दिवसांत 15 वेळा पेट्रोल-डिझेल दरवाढ करावी लागली.
आता कच्चे तेल पुन्हा महागले तर आपल्याकडे इंधन दरवाढीचा किती मोठा भडका उडेल याची कल्पनाच न केलेली बरी! मुळात आपल्या देशात इंधन दरवाढीसाठी आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीत होणारी वाढ हे केवळ निमित्त असते. सध्या हे भाव वाढले हे ठीक आहे, पण जूनमध्ये लॉक डाऊन काळात सगळं काही स्थिर असतानाही पेट्रोल-डिझेलच्या दरांनी नव्वदी पार केली होती. आता तर सरकार जागतिक दरवाढीची ढाल पुढे करून इंधन दरवाढीबाबत हात वर करणार हे उघड आहे. यावरच शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून मोदी सरकारला टोला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- खोटी GST बिले सादर करून फसवे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवणाऱ्या लेखापरिक्षकाला अटक
- ‘मी कंगाल आहे माझी सगळी संपत्ती ‘या’ व्यक्तीने लुबाडली’, राखी सावंतचा खळबळजनक दावा
- मुंबईचा पुढील महापौर भाजपचा आणि उपमहापौर ‘आरपीआय’चाच होईल- आठवले
- नवी दिल्ली : देशाचा अन्नदाता आज उपोषणावर
- ‘जर आंदोलनात एकही शेतकरी नाही, तर सरकारची आंदोलनकर्त्यांशी चर्चा का?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
