Share

नवी दिल्ली : देशाचा अन्नदाता आज उपोषणावर

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा आज 20 वा दिवस आहे. आता लवकरच या आंदोलनावर तोडगा निघू शकतो, अशी शक्यता वर्तवली आज आहे. मात्र, 19 दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनाने आता आक्रमक स्वरूप धारण केले आहे.

नव्या जाचक कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन तीव्र आणि देशव्यापी करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला असून रविवारी सकाळी ‘चलो दिल्ली’ आंदोलन, तर आज (सोमवारी) प्रमुख शेतकरी नेते उपोषण करणार आहेत. आम्ही सरकारशी चर्चेस तयार आहोत; मात्र आधी तिन्ही नवे कृषी कायदे रद्द करण्याबाबत चर्चा होईल, असे शेतकऱ्यांच्या नेत्यांनी सांगितले आहे.

तीनही कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीवर आंदोलक शेतकरी ठाम असून, सोमवार, १४ डिसेंबरपासून आंदोलन आणखी तीव्र केले जाईल. शेतकरी संघटनांचे नेते सोमवारी सामूहिक उपोषण करणार असून, देशभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे.

तर  ‘काही संघटना आंदोलन मागे घेत आहेत आणि सांगत आहेत की, सरकारने लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांच्या बाजूने आहेत. मात्र, आमचा त्या संघटनांशी काहीही संबंध नसून सरकार कायदे मागे घेत नाही, तोवर आंदोलन सुरूच राहील, याचा पुनरुच्चार चदुनी यांनी केला. सरकार आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असून, सहभागी होण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना अडवले जात आहे, असाही आरोप त्यांनी केला.

शहाजहाँपूर महामार्ग बंद करण्याच्या आंदोलनात हनन मोल्ला, डॉ.अशोक ढवळे, राजू शेट्टी, मेधा पाटकर, प्रतिभा शिंदे, योगेंद्र यादव, सत्यवान, कविता कुरुगंटी, वेंकटरामय्या हे अखिल भारतीय किसान सभेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य, तसेच आमरा राम, पी.कृष्ण प्रसाद, विजू कृष्णन, मेजर सिंह, सुरेंद्र सिंह, फुलसिंह शेवकंद, विक्रम सिंह, उषा राणी, मयुख विश्वास आणि इतर नेते सहभागी झाले.

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व त्यांचे मंत्रिमंडळ सहकारी यांनीही शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून सोमवारी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे जाहीर केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!