अहमदनगर : १९ फेब्रुवारी रोजी नेवासा तालुक्यातील करजगाव येथील शेतकरी अशोक टेमक यांनी शेतातच अडीच एकर उभा ऊस पेटवून दिला होता. मुळा सहकारी साखर कारखान्याने उसाला तोड दिली नाही, असा आरोप करत या शेतकऱ्याने पर्यायच उरला नाही म्हणून हे पाऊल उचलले होते. ‘विधानसभा निवडणुकीत मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या विरोधात काम केल्याने कारखान्याने आमचा ऊस घेतला नाही,’ असा आरोप या शेतकऱ्याने केला होता.
दरम्यान, आज आणखी एका शेतकऱ्याने हाताशी आलेला ऊस पेटवला आहे. सोनई मधील शेतकरी ऋषिकेश शेटे याने देखील कष्टाने पिकवलेला ऊस शेतातच पेटवून दिला आहे. या घटनेची दखल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलणार का ? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर या घटनेचे फोटो व व्हिडीओ देखील शेअर केला आहे.
शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख यांच्या बेबंदशाहीला कंटाळून 19 फेब्रुवारी रोजी एका शेतकर्याने उस पेटविल्यानंतर आज आणखी एका शेतकर्याने आपल्या शेतातील उस पेटवून दिला.
घाम गाळून कष्ट घेणार्या शेतकर्याला हाती आलेलं पीक पेटवून देताना काय वेदना झाल्या असतील ❓
(1/2) pic.twitter.com/ACi1OElro6— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 4, 2021
‘शिवसेना हा पक्ष दहशत निर्माण करण्यासाठीच आहे का ? आमच्यापैकी कोणी जर काही बोलायला गेलं की मंत्री सांगतात, ९० कोटी रुपयांना मंत्रिपद विकत घेतलंय’ असा आरोप शेतकरी ऋषिकेश शेटे यांनी केला आहे. तर, ‘शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख यांच्या बेबंदशाहीला कंटाळून 19 फेब्रुवारी रोजी एका शेतकऱ्याने उस पेटविल्यानंतर आज आणखी एका शेतकऱ्याने आपल्या शेतातील ऊस पेटवून दिला. घाम गाळून कष्ट घेणाऱ्या शेतकऱ्याला हाती आलेलं पीक पेटवून देताना काय वेदना झाल्या असतील? ‘ असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
अनेक राज्य आणि राष्ट्रांचा भाषणप्रवास करणारे मा. मुख्यमंत्री किमान एकदा तरी मुळा साखर कारखान्याकडून होणार्या छळावर बोलणार का❓
आपले मंत्री बाहेर काय उत्तर देतात, तेही कृपया ऐका एकदा❗️
(2/2) pic.twitter.com/Be0vID8LTv— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 4, 2021
तसेच, ‘अनेक राज्य आणि राष्ट्रांचा भाषणप्रवास करणारे मा. मुख्यमंत्री किमान एकदा तरी मुळा साखर कारखान्याकडून होणाऱ्या छळावर बोलणार का ? आपले मंत्री बाहेर काय उत्तर देतात, तेही कृपया ऐका एकदा’ अशी टीका देखील त्यांनी केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बाबीची दखल घ्यावी, अन्यथा ऊसातच आत्मदहन करू असा इशारा शेतकरी ऋषिकेश शेटे यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मेट्रो मॅन’ ई. श्रीधरन असणार केरळमध्ये भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार
- मुनगंटीवारांची राष्ट्रपती राजवटीची भाषा ही मोदींची राजकीय भूमिका – नाना पटोले
- मी फक्त पूजाला रिक्षात ठेवलं, लॅपटॉप मोबाईलबद्दल मला कहीही माहित नाही; भाजप नगरसेवकाचा दावा
- ‘आता संजय राठोडला अटक करायला किती दिवस लावणार ?’
- परीक्षा ऑनलाईन देणार की ऑफलाईन? माहिती द्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

