🕒 1 min read
जालना : शेतकरी भावांनो, धीर धरा आत्महत्या हा मार्ग नाही, अशी भावनिक साद माजी मंत्री आमदार बबनराव लोणकारांनी शेतकऱ्यांना घातली आहे. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, रस्त्यावर, विधानभवनात वेळ पडल्यास न्यायालयीन लढाई लढली जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे. परतुर तालुक्यातील वाहेगाव येथील आत्महत्या केलेल्या शेतकरी दत्ता मच्छिंद्र काटे यांच्या कुटुंबीयांची त्यांनी भेट घेऊन सांत्वन केले. या वेळी ते बोलत होते.
शेतकऱ्याच्या आत्महत्येसाठी जबाबदार असणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी लोणीकर यांनी यापूर्वीच केलेली आहे. तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांनी कोणत्याही प्रकारची अतिवृष्टीची प्रशासकीय कार्यवाही पूर्ण केली नाही. परिणामी तालुक्यातील केवळ ३६ गावांचा समावेश अतिवृष्टीग्रस्त म्हणून करण्यात आला आहे. परिणामी अतिवृष्टी मध्ये प्रचंड नुकसान झालेले असताना देखील कोणतीही मदत मिळणार नाही या भावनेतून दत्ता मच्छिंद्र काटे यांनी आत्महत्या केल्याचे लोणीकर यांनी पत्रात नमूद केले आहे.
आज वाहेगाव सातारा ता,परतुर येथे दत्ता मच्छिंद्र काटे नामक दुसऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांला देखील अतिवृष्टीचे पंचनामे न झाल्यामुळे झालेले नुकसान व शासनाच्या नाकर्तेपणामुळे आत्महत्या केली. त्याच्या कुटुंबाची सांत्वणपर भेट घेतली.यावेळी तहसिदार चित्रक मँडम हे देखील उपस्थित होत्या.! pic.twitter.com/FLJzyWdJHo
— Babanrao Lonikar (@BabanraoLonikar) September 17, 2021
दत्ता मच्छिंद्र काटे नामक अल्पभूधारक शेतकऱ्याने अतिवृष्टीचे पंचनामे न झाल्यामुळे झालेले नुकसान व शासनाच्या नाकर्तेपणामुळे कोणत्याही प्रकारची मदत मिळणार नाही या भावनेतून आत्महत्या केली आहे. परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची मागणी लोणीकर यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आतापर्यंत झाला तो अपमान बस झाला, यापुढे असा अपमान सहन करत काँग्रेसमध्ये राहू शकत नाही’
- खंडणीखोर देखील यांची कृती पाहून आत्महत्या करतील – सुधीर मुनगंटीवार
- ‘पवारांवर जनताच नाराज; त्यामुळे उद्धव ठाकरेंवर नाराजी व्यक्त करण्याचा त्यांना अधिकार नाही’
- ‘२०२४ च्या निवडणुकीनंतर शिवसेना वर्गणी जमा करण्यापूर्ती पण राहणार नाही’
- ‘..आता कोथळा काढायची भाषा केली जाते!’, शरद पवारांचे महाराष्ट्रातल्या परिस्थितीवर भाष्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
