मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासुन कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी लॉकडाऊन लागु करण्यात आला होता. यादरम्यान पुन्हा एकदा अनेक बॉलिवुड चित्रपटांचे प्रदर्शन रखडले होते. मात्र कोरोनाचा प्रभाव ओसरु लागल्याने टप्याटप्याने लॉकडाउन शिथील करण्यात येत आहे. यादरम्यान अनेक रखडलेले चित्रपट प्रदर्शीत होण्याच्या मार्गावर आहे.
याच पार्श्वभूमिवर फरहान अख्तरने त्याचा आगामी चित्रपट ‘तुफान’च्या प्रदर्शनाची तारिख जाहीर केली आहे. येत्या १६ जुलै रोजी अमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शीत होणार आहे. फरहान अख्तर तुफान चित्रपटात बॉक्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी फरहानने खूप मेहनत घेतली आहे. त्याने या भूमिकेसाठी सहा आठवड्यात तब्बल १५ किलो वजन वाढविले होते. तुफान हा सिनेमा यापुर्वी २१ मे रोजी अमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार होता. मात्र कोरना परिस्थीतीमुळे फरहानने हा चित्रपट पुढे ढकलला.
With humility, love and in dedication to the fighting spirit of the beautiful people of our nation, our film ‘Toofaan’ will be releasing on July 16th. #ToofaanOnPrime
⁰⁰@PrimeVideoIN @excelmovies @ROMPPictures @mrunal0801 @SirPareshRawal @hussainthelal pic.twitter.com/0sd9yZ8Zy0
— Farhan Akhtar (@FarOutAkhtar) June 16, 2021
या चित्रपटात फरहान अख्तर शिवाय परेश रावल, मृणाल ठाकूर, सुप्रिया पाठक, हुसैन दलाल असे कलाकार आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन हे राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी केले आहे. फरहान अख्तर आणि राकेश ओमप्रकाश मेहरा यांचा हा एकमेकासोबत दुसरा सिनेमा आहे. याआधी दोघांनी २०१३ मध्ये प्रदर्शित ‘भाग मिल्खा भाग’ या सिनेमात एकत्र काम केले होते. या चित्रपटाद्वारे फरहान अख्तर आणि राकेश ओमप्रकाश मेहरा ही दमदार जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘औरंगाबाद शहरातील लोक जाती-धर्मावर मतदान करतात, त्यांना विकास आवडत नाही’
- गोड गळ्याची लिटील चॅम्प आर्या अंबेकर झाली २७ वर्षाची
- सिद्धार्थ-मितीलीच्या घराबाहेर अनोख्या पाहुण्यांचे आगमन…
- ‘महाविकास आघाडी सरकारमुळे ओबीसींचं आरक्षण गेलं, मग छगन भुजबळ यांची नौटंकी कशासाठी ?’
- ‘मराठा आरक्षण रद्द होण्यास केंद्र आणि राज्य सरकार कारणीभूत’ – प्रकाश आंबेडकर

