Share

‘गली बॉय’ चित्रपटातील ‘या’ प्रसिद्ध रॅपरचे निधन!

Published On: 

मुंबई : गेल्या दोन वर्षात बॉलिवूडने अनेक कलावंत कलाकार गमावले आहेत. अशातच आता एका प्रसिद्ध रॅपरने जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे. ‘गली बॉय’ सिनेमातील रॅपर एमसी तोडफोड या नावाने ओळखल्या जाणाऱ्या धर्मेश परमारचं निधन झालं आहे. धर्मेशच्या निधनाने कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे.

धर्मेशचं निधन कार अपघातात झालं असल्याचं सांगितलं जात आहे. पण कुटुंबाने धर्मेशच्या निधनाचं कारण अद्याप सांगितलेलं आहे. त्यामुळे त्याचं निधन कार अपघातात झालं, यावर प्रश्नचिन्ह आहे. धर्मेशच्या निधनावर शोक व्यक्त करत अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीने सोशल मीडियाच्या माध्यमातून रॅपर एमसी तोडफोडला श्रद्धांजली वाहिली आहे.

रणवीरने इन्स्टा स्टोरीमध्ये धर्मेशचा फोटो पोस्ट केला आहे. तर सिद्धांतने धर्मेशचा फोटो शेअर करत ‘आरआयपी भाई’ असं लिहिलं आहे. धर्मेशचं निधन अवघ्या 24 व्या वर्षी झाल्यामुळे सर्वांना मोठा धक्का बसला आहे.

महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!