मुंबई : प्रसिद्ध अभिनेता प्रशांत दामले यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. याबाबत त्यांनी स्वत: फेसबुकच्या माध्यमातून माहिती दिली असून त्यांना सात दिवस आयसोलेशनमध्ये राहण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे.
महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. सिनेश्रुष्टी मध्ये सुद्धा गेल्या काही दिवसात मोठया मोठया कलाकारांना कोरोनाची लागण झाली होती यामध्ये अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन व ऐश्वर्या रॉय बच्चन तसेच बऱ्याच कलाकारांना सुद्धा कोरोनाची लागण झाली होती. आता गरिबांन पासून मोठया मोठया कलाकारांना सुद्धा कोरोनाची लागण होत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आले होते. त्या दरम्यान, सर्व शूट बंद करण्यात आले होते. दरम्यान, लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या प्रशांत दामले यांच्या नाटकाचा प्रयोग १२ डिसेंबरला पुण्यात झाला होता. पुण्याचा प्रयोग संपल्यानंतर मुंबईत आल्यावर त्यांना थोडीशी कणकण जाणवत होती. त्यामुळे त्यानी कोरोना चाचणी केली. त्यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच डॉक्टरांनी त्यांना सात दिवसांचं आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- नवीन अपांरपारिक ऊर्जा धोरण उद्योग क्षेत्राला पूरक – नितीन राऊत
- ‘त्या’ व्हायरल व्हिडिओवर चौकशी दरम्यान करणचे अजब उत्तर
- पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष 10 जागांवर लढणार – रामदास आठवले
- ‘ड्रग घेतल्याची कबुली देणाऱ्या कंगणाच्या चौकशीची हिम्मत एनसीबी कधी दाखवणार’?
- ASSOCHAM च्या स्थापनेला 100 पूर्ण, पंतप्रधान मोदी करणार रतन टाटा यांचा पुरस्काराने गौरव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

