मुंबई : अभिनेता सुशांतच्या निधनानंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला होता. तेव्हापासून एनसीबीकडून बॉलिवूडमधील अमली पदार्थ सेवन शोधून काढण्याचे काम सुरुच आहे.
दरम्यान, दिग्दर्शक करण जोहर यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) मुंबई युनिटने नोटीस पाठवली आहे. त्या नोटिसीला येत्या शनिवारपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे. गेल्या वर्षी बॉलीवूड अभिनेते आणि अभिनेत्रींच्या पार्टीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. नेमकी ती पार्टी कधी झाली होती हे अद्याप स्पष्ट झालेले नव्हते. मंजिंदर सिरसाच्या तक्रारीवरून एनसीबीने तपास सुरू केला आहे.
या व्हिडीओमध्ये कलाविश्वातील अनेक दिग्गज दिसून येत होते. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर या पार्टीत अंमली पदार्थांचं सेवन करण्यात आल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. त्यामुळे करणला या व्हिडीओविषयी एनसीबीने काही प्रश्न विचारले. मात्र, ज्या फोनमध्ये तो व्हिडीओ होता तो मोबाईल हरवल्याचं स्पष्टीकरण करणने दिलं आहे.
नुकत्याच झालेल्या एनसीबी चौकशीमध्ये करणला या व्हिडीओविषयी विचारणा करण्यात आली. मात्र, “ज्या फोनमध्ये तो व्हिडीओ काढण्यात आला होता. तो मोबाईल हरवला आहे”, असं उत्तर करणने दिलं. त्यासोबतच “माझ्या पार्टीत कुठल्याही प्रकारच्या अंमली पदार्थांचं सेवन केलं गेलं नाही” असं तो म्हणाला.
महत्वाच्या बातम्या
- ‘सावध राहण्याची खरी गरज हिंदुस्थानला; नेपाळचा घास याआधीच चिनी ड्रॅगनने गिळला’
- ‘काँग्रेस सरकारांनी केलेली कर्जमाफी हे आपल्या देशातील शेतकऱ्यांच्या फसवणुकीचं मोठं उदाहरण’
- सोलापूरकरांसाठी संकटात धावून आलेला तो ‘संकटमोचक शार्प शुटर’ कोण? घ्या जाणून
- आज केबीसीच्या कर्मवीर भागात ‘डिसले गुरुजी’ खेळणार खास कारणास्तव!
- हुश्श! अखेर करमाळ्यात दहशत माजवणाऱ्या बिबट्याचा खेळ खल्लास


