🕒 1 min read
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानींच्या बंगल्याजवळ जिलेटिनच्या स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी २५ फेब्रुवारीला सापडली होती. २४ फेब्रुवारीच्या मध्यरात्री १ वाजता अंबानी यांच्या घराजवळ ही कार ठेवण्यात आली होती. तर दुसऱ्या दिवशी गुरुवारी ही कार पोलिसांच्या निदर्शास आली होती. ही घटना उघडकीस येताच या घटनेचा तपास क्राईम ब्रांचच्या सीआययु युनिट कडे देण्यात आला होता.
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकानंतर आता नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे. कारण जी स्कॉर्पिओ अंबानींच्या घराबाहेर सापडली होती, त्या गाडीमालकाचा मृतदेह सापडला आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर भागात सापडला आहे. ही घटना अत्यंत धक्कादायक असून हा फार मोठा कट असू शकतो अशी शंका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित करत गृहमंत्री अनिल देशमुख यांना याबाबत सवाल केला होता.
हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूची माहिती दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणावर काही प्रश्न उपस्थित केले. हिरेन यांचा मृतदेह सापडला असून त्यांचे हात बांधलेले होते. त्यांच्या मृतदेहाचे फोटो मी पाहिले आहे. हात बांधून कोणी जीव देत नाही. एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांच्याकडेच या प्रकरणाचा तपास कसा ? ते मुकेश अंबानींच्या घराबाहेर कसे पोहोचले ? तुम्ही कुणाला वाचवत आहात? असा सवाल त्यांनी केला होता. यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उत्तर देताना अर्णब गोस्वामींना आत टाकलं म्हणून तुमचा वाझेंवर राग आहे का? असं प्रत्युत्तर दिलं. यानंतर भाजप नेत्यांनी तीव्र आक्षेप घेत हे विधान अनिल देशमुख यांनी मागे घ्यावं अशी मागणी केली होती. यामुळे काही गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.
महत्वाच्या बातम्या
- भाजपच्या हुकमी एक्क्याच्या बालेकिल्ल्यात जाऊन निवडणूक लढवणार बंगालची वाघीण
- “अनिल देशमुखांचा ‘तो’ खुलासा सुसंस्कृत महाराष्ट्राची मान खाली घालायला लावणारा”
- रासायनिक अमली पदार्थ तयार करणाऱ्या कंपन्या सील करण्याचे अधिकार राज्य शासनाला मिळणार ?
- CBSE बोर्डाच्या दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये बदल; घ्या जाणून सुधारित वेळापत्रक!
- सर्दी खोकल्याची औषधे विकू नका ; FDA च्या सूचना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
