Share

भाजपच्या हुकमी एक्क्याच्या बालेकिल्ल्यात जाऊन निवडणूक लढवणार बंगालची वाघीण

Published On: 

कोलकाता- पश्चिम बंगालमध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. गेल्या 10 वर्षांपासून ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाची सत्ता आहे. या सत्तेला भाजपनं मोठं आव्हान निर्माण केलं असतानाच असदुद्दीन ओवेसी यांच्या MIM पक्षानं निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचं ठरवलं. त्यामुळे ममता बॅनर्जींसमोरील आव्हान आणखीच तीव्र झालं आहे.

भाजपने पश्चिम बंगालमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. बंगालमध्ये सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार मुकाबला होईल, असेच सध्याचे चित्र आहे. अर्थात, कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांनी हातमिळवणी केल्याने त्यांची आघाडीही मोठे आव्हान उभे करण्याची शक्यता आहे.

दरम्यान,आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसच्या सुप्रीमो ममता बॅनर्जींनी सर्व 291 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. उमेदवारांची यादी जाहीर केलेला तृणमूल पहिलाच पक्ष आहे.TMC च्या यादीत 100 नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

यंदा तृणमूलकडून 50 महिला आणि 42 मुस्लिम उमेदवारांना संधी मिळाली आहे. ७९ अनुसूचित जातीमधील उमेदवार आणि १७ अनुसूचित जमातीमधील उमेदवार असल्याची माहिती दिली आहे.तृणमूल दार्जिलिंगच्या 3 जागांवर आपले उमेदवार उतरवणार नाही, या जागा सहयोगी पक्षासाठी सोडण्यात आल्या आहेत.

दरम्यान,माजी क्रिकेटर मनोज तिवारीला पक्षाने हावडाच्या शिवपूरमधून उमेदवारी दिली आहे.तर स्वतः ममता बॅनर्जी नंदीग्रामवरुन निवडणूक लढवणार आहेत.तृणमूल कॉंग्रेसला सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेले शुभेंदु अधिकारी यांचा हा मतदारसंघ बालेकिल्ला आहे.ममता स्वतः या मतदार संघातून लढणार असल्याने या लढतीकडे सर्वांचेच विशेष लक्ष असणार आहे.

दरम्यान, भाजपने अजून उमेदवारांची यादी जाहीर केलेली नसल्याने अधिकारी कुठून लढणार हे स्पष्ट झालेले नाही.शुभेंदू अधिकारी यांनी भाजपच्या बैठकीत म्हटले आहे की, नंदीग्राममधून ममता बॅनर्जी यांच्या विरोधात मैदानात उतरल्यास ते किमान 50 हजार मतांनी मुख्यमंत्र्यांचा पराभव करतील.दरम्यान, नंदीग्राम, भवानीपूरसह सुमारे 15 जागांवरील उमेदवारांच्या नावाचा अंतिम निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी, जेपी नड्डा आणि अमित शाह यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!