Share

“अनिल देशमुखांचा ‘तो’ खुलासा सुसंस्कृत महाराष्ट्राची मान खाली घालायला लावणारा”

Published On: 

मुंबई : जळगाव येथील एका वसतिगृहात पोलिसांनी काही तरुणींना विवस्त्र होऊन नृत्य करायला लावल्याची तक्रार एका महिलेने दिली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या धक्कादायक घटनेनंतर राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील पडसाद उमटले होते.

महिला वसतीगृहात घडलेल्या घटनेची चौकशी करण्याकरिता विविध खात्यातील सहा महिला अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं होतं. अनिल देशमुख यांनी सर्व आरोप फेटाळून लावत यात काहीही तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. या वसतीगृहात 17 महिला राहत होत्या. 20 फेब्रुवारी रोजी या वसतीगृहात एक मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी गरब्याचा डान्स सुरु होता. तेव्हा गरम होत असल्यामुळे एका महिलेने अंगातील झगा उतरवून ठेवला.’ अशी माहिती अनिल देशमुख यांनी काल विधानसभेत दिली होती.

तसेच, ‘याउपर त्याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पोलीस खात्यातील कोणतीही व्यक्ती तिथे उपस्थित नव्हती. पोलिसांनी या तरुणींना विवस्त्र करून नृत्य करायला लावल्याची तक्रार ही खोटी आहे. तक्रार दाखल करणारी महिलेचे मानसिक संतुलन देखील ठीक नाही,’ असा खुलासा अनिल देशमुख यांनी केला आहे.

दरम्यान, अनिल देशमुख यांच्या या वक्तव्यांवर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी आक्षेप घेत त्यांच्यावर जहरी टीका केली आहे. ‘जळगाव महिला वसतिगृहाच्या गैर प्रकाराबद्दल महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यांनी केलेला खुलासा सुसंस्कृत महाराष्ट्राची मान खाली घालायला लावणारा आहे… हाकला या अकार्यक्षम गृहमंत्र्याला. मी म्हणालोच होतो ठाकरे मंत्रिमंडळात अनेक शक्ती कपूर आहेत.’ असा घणाघात भातखळकर यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!