बीड : महाराष्ट्र ही महापुरुषांची भूमी आहे. संत भगवानबाबांसह महापुरुषांचे विचार हे समाजाच्या उद्धारासाठी प्रेरणादायी आहेत. यामुळे महापुरुषांना कोणत्याही विशिष्ट जातीपातीच्या चौकटीत अडकवणे योग्य होणार नाही, असे मत राज्याचे राज्याचे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.
शहरातील जनता दरबारानंतर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शहराच्या मध्यवस्तीतील संत भगवानबाबा सामाजिक प्रतिष्ठानला भेट दिली. याप्रसंगी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित स्वागत समारंभात ते बोलत होते. मंत्री मुंडे म्हणाले, अशिक्षित व अप्रगत समाजाला शिक्षणाची गोडी निर्माण करणारे, भूदानसारख्या चळवळीला मराठवाड्यात आणणारे संत भगवानबाबांचे जीवनकार्य महान आहे. त्यांच्या विचारांचा ठेवा आपण जपला पाहिजे.
प्रतिष्ठानचा विकास व सुशोभीकरणाबाबत बोलताना ते म्हणाले की, या प्रतिष्ठानचे उद्घाटन स्व. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी केले. त्यावेळी आपण सोबत होतो. प्रतिष्ठानच्या कार्यालयाचे उद्घाटन स्व. पंडितअण्णा मुंडे यांच्या हस्ते झाले. त्याही वेळी मी सोबत होतो आणि आज प्रतिष्ठानच्या विकासाची जबाबदारी माझ्याकडे घेतोय, हे माझं भाग्यच आहे, असे भावनिक उद्गारही मुंडेंनी काढले.
या वेळी आमदार संदीप क्षीरसागर, बजरंग सोनवणे, माजी आमदार सुनील धांडे, माजी आमदार सय्यद सलीम, सावता परिषदेचे अध्यक्ष कल्याणराव आखाडे, भगवान बाबा प्रतिष्ठानचे विश्वस्त डॉ. लहानेंसह प्रतिष्ठानचे पदाधिकारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- पियुष गोयल शेतीतज्ज्ञ आहेत हे कळाल्याने माझ्या ज्ञानात भर पडली : शरद पवार
- ‘उस्मानीचे भाषण ऐकले नाही, मुळात एल्गार परिषदेला महत्व देत नाही’
- भांडवलदारांना कृषी व्यवसायात चंचूप्रवेश देण्याचा मोदींचा डाव; ‘या’ मंत्र्याचा आरोप
- शेतकरी आंदोलनावरील आंतरराष्ट्रीय प्रतिक्रियांवर पंतप्रधानांच भाष्य
- भीषण : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला उत्तराखंड दुर्घटनेचा आढावा


