हिंगोली : शहरामधील तीन शाळांची नगर परिषदेमध्ये थकबाकी असल्यामुळे त्या सील करण्यात आल्या आहेत. नगर परिषद कार्यालयामधून वसुलीचे शंभर टक्के उद्दीष्टे पुर्ण करण्यासाठी हिंगोली नगर परिषदेने मोहिम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे.
त्यामुळे नगर परिषदेने थकीत कराची रक्कमेची वसुली मोहिम राबवण्यास सुरुवात केली आहे.त्यामुळे शहरातील शांताबार्इ मुंजाजी दराडे माध्यमिक शाळेचे २००२ – ०३ ते २०२१ पर्यंतचे ८ लाख १६ हजार ९४० रुपयांची मालमत्ता कराची थकीत रक्कम तर जुनी मल्टीपर्पज हायस्कुल .जि. प. हिंगोली यांच्याकडे २००९ ते १० ते २०२० ते २१ पर्यंतचे ५ लाख २४ हजार १६२ आणि जिल्हा परिषद कन्या प्रा. शाळेचे २००४ – ५ ते २०२० ते २१ पर्यंतचे ७ लाख ८३ हजार ६४२ रुपयांची बाकी आहे. कराची थकबाकी असणाऱ्या तिन्ही शाळांना नगर परिषदेने नियमीतपणे वसुली बाबत पत्रव्यवहार केला होता.
परंतू हे तीन्ही थकबाकीदार कर भरण्यासाठी टाळाटाळ करत होते. त्यामुळे शेवटी नगर परिषदेने बुधवारी मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्या पथकाने तिन्ही शाळांच्या इमारतीला सील ठोकले. या वेळी पथकामध्ये उपमुख्याधिकारी उमेश हेबांडे, प्रशासकीय अधिकारी श्याम माळवटकर, कार्यालयीन अधिक्षक डी. बी. ठाकुरसह आदींची उपस्थिती होती. दरम्यान या कारवाईमुळे शहरातील कराचे थकबाकीदार असणारे मात्र घाबरले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
- आयपीएल सामन्यांना प्रेक्षकांच्या उपस्थितीवर संभ्रम कायम
- अनुराग कश्यप, तापसी पन्नूच्या मालमत्तांवर इन्कम टॅक्सची धाड
- खास फीचर्सने ग्राहकांना आकार्षित करणाऱ्या रेनो किगरची डिलीव्हरी सुरु
- दुचाकीवर बनावट क्रमांक टाकून फिरणारा गजाआड
- ‘तेरणा’ सुरू करण्यासाठी जनआंदोलन पेटणार, नेत्यांना गावबंदीचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
