Share

बाईक रायडर्स साठी खुशखबर ! बजाज ऑटोची खास ससपेन्शन बाईक लाँच

Published On: 

नवी दिल्लीः तरुणाई मध्ये आणि बाईक रायडर्स यांच्या कडून विशेष पसंती असलेल्या अनेक बाईक्स बाजारात उपलब्ध असतात. यामध्ये बजाज या नामांकित कंपनीला नेहमीच ग्राहकांकडून प्राधान्य दिले जाते. आता बजाज ऑटोने १०२ सीसी प्लॅटिना ही इलेक्ट्रिक स्टार्टमध्ये (ईएस) लाँच केली आहे.

बजाज ईसमध्ये खास ससपेन्शन बसविण्यात आले आहे. त्यामुळे लांब पल्ल्याचा प्रवासही सुखकर होऊ शकतो. दुचाकीस्वारासह त्याच्या सोबत असणाऱ्या व्यक्तीलाही दुचाकीवरून आरामदायी प्रवास करता येणे शक्य आहे. दुचाकीचे ट्यूबलेस टायर आहेत. त्यामुळे ग्राहकांना विनात्रास आणि अधिक सुरक्षिततेचा टायरमधून पर्याय मिळतो. या दुचाकीची किंमत ५३,९२० रुपये (एक्स शोरुम दिल्ली) आहे.

प्लॅटिना ब्रँडचे ७० दशलक्षांहून अधिक ग्राहक समाधानी असल्याचे बजाज ऑटोच्या मार्केटिंगचे प्रमुख नारायण सुंदररमण यांनी सांगितले. नवीन प्लॅटिना १०० ईसमध्ये किक स्टार्टमधून सेल्फ स्टार्टमध्ये ग्राहकांना अद्ययावत होता येणार असल्याचेही सुंदररमण यांनी म्हटले आहे. बजाज ऑटोच्या वाहनांच्या विक्रीत चालू वर्षात फेब्रुवारीमध्ये ६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. चालू वर्षात फेब्रुवारीमध्ये ३ लाख ७५ हजार १७ वाहनांची विक्री झाली आहे. गतवर्षी फेब्रुवारीमध्ये ३ लाख ५४ हजार ९१३ वाहनांची विक्री झाली होती.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!