परभणी : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीबाबत महाराष्ट्र सरकारने गांभीर्याने निर्णय घ्यावा, असे आदेश राज्याच्या विधानपरिदेचे सभापतींनी गुरुवारी दिले आहेत. या बाबत परभणी शहरासह जिल्हामध्ये जनजागृती समिती स्थापन करुन सर्व पक्षीय समितीने हा विषय लावून धरला होता. आता मात्र सभापतींच्या आदेशाने तरी वैद्यकीय महाविद्यालयाचा विषय तडीस जावू शकेल, अशी अपेक्षा परभणीकरांनी व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी गुरुवारी विधान परिषदेत तारांकित प्रश्नाव्दारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणात परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा नामोल्लेख नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. गुणवत्तेला पात्र ठरलेल्या तसेच तीन शासकीय समित्यांनी शिफारस केलेल्या परभणी वैद्यकीय महाविद्यालयाकडे या पद्धतीने दुर्लक्ष करणे चुकीचे आहे, असे दाखवून दिले. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांप्रंमाणे परभणीत सुद्धा वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेबाबत मंत्रिमंडळाने मान्यता द्यावी, अशी अपेक्षा देखील व्यक्त केली. आमदार दुर्राणी यांनी या मागण्यातून अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत परभणी परिसरातील अन्य जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सेवा पुरवण्याबाबत वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करणे गरजेचे असल्याचेही स्पष्ट केले.
या वेळी कमीत कमी निधीमध्ये हे महाविद्यालय तात्काळ सुरू होवू शकते. तसेच सर्वप्रकारे अनुकूलता आहे, तरी देखील याबाबत होणारी दिरंगाई ही आक्षेप घेण्यासारखी असल्याचे या वेळी सभापतींनी सांगितले. सभापतींनी आमदार दुर्राणी यांच्या या मागणीची तत्काळ दखल घेतली आहे. राज्यपालांच्या अभिभाषणात परभणी येथील वैद्यकीय महाविद्यालयाचा मुद्दा टाळल्याबद्दल खंत व्यक्त करत राज्य सरकारने या गोष्टीची गंभीर दखल घ्यावी, असे आदेश देखील दिले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
- धनंजय मुंडेंना धक्का, ‘या’ ठिकाणी नमिता मुंदडा यांचे पुन्हा एकदा वर्चस्व
- एसटी अधिकाऱ्याला शिवीगाळ; ‘वंचित’च्या जिल्हाध्यक्षांना ठोकल्या बेड्या
- कोविड सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी‘एसओपी’ लागू, अजित पवारांची घोषणा
- चौथ्या कसोटीत नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने ; बुमराहच्या जागी ‘या’ खेळाडूला संधी
- पोलार्डचा धमाका एकाच षटकात लगावले ६ उत्तुंग षटकार; धनंजय ची हॅटट्रीक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
