Share

Shivsena | मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटाची याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली

Published On: 

🕒 1 min read

Shivsena | नवी दिल्ली : एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेना पक्षावर तसेच धनुष्यबाण चिन्हावर दावा केला. त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह वापरण्यास बंदी घालण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे यांच्या गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका आज न्यायालयाने फेटाळली आहे. तसेच शिवसेनेच्या दोन गटांमध्ये सुरू असलेल्या वादावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे न्यायालयाने निवडणूक आयोगाला सांगितले आहे.

निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला स्वतंत्र चिन्ह दिली होती. शिवाय धनुष्यबाण हे शिवसेनेनचं पक्षचिन्ह आणि शिवसेना हे पक्षाचं नावही गोठवलं होतं. या विरोधात ठाकरे गटाने आवाज उठवला होता. पक्षाचं निवडणूक चिन्ह आणि नाव गोठवण्याच्या प्रक्रियेविरोधात ठाकरे गटाने दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती. त्यावर आज महत्त्वाची सुनावणी पार पडली. यामध्ये ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे.

अंधेरी पोटनिवडणूक लढण्यासाठी पक्षचिन्ह गोठवण्यात आलं होतं. मात्र शिंदे गटाने आपला उमेदवारच या निवडणुकीत दिला नाही. शिवाय आता पोटनिवडणूक संपली असून ताप्तुरता निर्णय आता पुन्हा मागे घ्यावा, अशी मागणी ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली होती. या संदर्भात सोमवारी ठाकरे गटाने दिल्ली हायकोर्टात युक्तिवाद केला होता. यावेळी धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे पक्षाचं नाव या दोन्ही गोष्टी वापरण्यास पुन्हा परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!