🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : लिव्हर (Liver) हा आपल्या शरीराचा खूप महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी आरोग्य (Health) बरोबरच लिव्हरची काळजी घेणे देखील खूप महत्त्वाचे असते. कारण लिव्हरला शरीराचे पॉवर हाऊस म्हणून संबोधले जाते. लिव्हर आपल्या शरीरातील आवश्यक विटामिन्स, मिनरल, अँटीअँक्सीडेंट इत्यादी वेगळे करते. त्याचबरोबर लिव्हर आपल्या रक्तातील घाण साफ करण्याचे देखील काम करते. त्यामुळे लिव्हरमध्ये काही समस्या निर्माण झाल्यास शरीराचे इतर भाग हळूहळू निकामी होऊ लागतात. त्यामुळे शरीरातील लिव्हर निरोगी ठेवणे हे खूप आवश्यक असते. म्हणूनच आज या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करता येईल, याबद्दल माहिती सांगणार आहोत.
बीट
बीटामध्ये मुबलक प्रमाणामध्ये बेटालेन नावाचे नायट्रेट आणि अँटिऑक्सिडेंट उपलब्ध असते. जे लिव्हरमधील ऑक्सिडेटीव्ह नुकसान आणि जळजळ कमी करण्यास मदत करते. त्यामुळे बीटाचे किंवा बीटाच्या ज्यूसचे नियमित सेवन केल्याने तुमचे लिव्हर निरोगी आणि तंदुरुस्त राहू शकते.
अक्रोड
फॅटी लिव्हरचे आजार कमी करण्यासाठी अक्रोड हा एक रामबाण इलाज आहे. अक्रोडमध्ये मुबलक प्रमाणात ओमेगा 1, ओमेगा 3 यासारखी फॅटी ॲसिड आढळतात. त्यामुळे अक्रोडचे नियमित सेवन केल्याने आपले लिव्हर सुदृढ राहू शकते.
द्राक्षे
लाल आणि जांभळ्या द्राक्षांमध्ये शरीराला सुरक्षित ठेवण्यासाठी लागणारे अनेक संयुगे आढळतात. यापैकी एक म्हणजे रोझवेराट्रोल आहे जे अँटीॲक्सीडेंट पातळी वाढवण्यास मदत करते. त्याचबरोबर यांचे नियमित सेवन केल्याने लिव्हरमधील जळजळ देखील कमी होते.
त्याचबरोबर लिव्हरला मजबूत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही हळद, गाजर, ब्रोकोली, बेरी, लसूण, हिरव्या पालेभाज्या इत्यादी गोष्टींचाही आपल्या आहारात समावेश करू शकता.
टीप : वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या
- Shivsena | मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटाची याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली
- Anil Desai | “आठवणींबद्दलच बोलायचंय तर आमच्याकडे 2009 पूर्वीच्या…”; फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अनिल देसाईंची टीका
- Urfi Javed | पाकिस्तानकडून कौतुक झाल्यावर उर्फी जावेद झाली अधिक सुसंस्कृत, पाहा व्हिडिओ
- Chandrashekhar Bawankule | “बैठकांवर अजित पवारांनी बोलू नये, त्यांना शोभत नाही” ; बावनकुळेंचा पलटवार
- Jitendra Awhad | मोठी बातमी! जितेंद्र आव्हाडांना विनयभंग प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
