Share

‘नागरिक मरतानाही लस निर्यात करणे गंभीर कृत्य’

Published On: 

नवी दिल्ली : कोरोनाची बाधा झालेल्या हजारो लोकांवर मृत्यू ओढावला जात असातानाही विदेशात लस निर्यात करण्याचा गंभीर गुन्हा केंद्र सरकारने केला, अशी परखड टीका आम आदमी पक्षाचे नेते तथा दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी रविवारी केली आहे. कोरोना प्रतिबंधक लस वेळेवर मिळाली असती, तर हजारो नागरिकांना नवसंजीवनी मिळाली असती, असेही ते म्हणालेत.

ऑनलाईन पत्रकार परिषदेत मनीष सिसोदिया यांनी लस उपलब्ध न होण्याच्या मुद्यावरून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढविला आहे. ते म्हणाले की, देशात योग्यवेळी लस न मिळाल्याने अनेकांवर मृत्यू ओढावला आहे; परंतु याचवेळी जगात भारताची प्रतिमा उजळ करण्यासाठी केंद्र सरकारने अनेक देशांना नाममात्र दरात लस विकण्याचे घृणास्पद कार्य केले.

६० टक्क्याहून आधिक प्रमाणावर कोरोना नियंत्रणात असतानाही मोदींनी ९३ देशांना लस विकली. जिथे कोरोनाचा जीविताला कोणताही धोका नव्हता, अशा ठिकाणी सुद्धा लस विकण्याचा प्रताप केंद्र सरकारने केला. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चांगलेच डोके वर काढले. यात मोठ्या संख्येने तरुणांना प्राण गमवावा लागला. यदाकदा त्यांना लस मिळाली असती तर त्यांचे प्राण वाचले असते, अशी टीका सिसोदिया यांनी केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!