Share

प्रार्थना बेहरेला रील बनवणे पडले महाग! काय घडलं? वाचा सविस्तर

Published On: 

🕒 1 min read

लंडन : ‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम प्रार्थना बेहरे सध्या लंडनमध्ये आहे. प्रार्थना तिच्या पतीसोबत लंडनमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. लंडनमध्ये व्हॅकेशन साठी गेली म्हंटल्यावर तिथले फोटो आणि व्हिडीओ तर शेअर होणारच. लंडनमध्ये फिरतानाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ प्रार्थनाने सोशल मिडीयावर शेअर केले आहेत.

आता प्रार्थनाला इंस्टाग्रामची एक रील बनवणे खूप महागात पडले आहे. प्रार्थना स्वतःचा व्हिडीओ स्वतःहा शूट करत होती. पण या दरम्यान हे बनवत असताना तिचा मोबाईल तिच्या हातातून निसटतो आणि तिच्या डोक्यावर पडतो. यामुळे प्रार्थनाच्या कपाळावर भलं मोठं टेंगुळ आलं आहे. व्हिडीओमध्ये ती थंड पाण्याच्या बॉटलने कपाळ शेकताना दिसत आहे.

टेंगुळ ऑन माय फोरहेड, असं कॅप्शन देत प्रार्थना तिच्या इंस्टाग्रामवरून व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना प्रार्थनाने म्हंटले आहे की, व्हिडीओवर लोकांनी एकापेक्षा एक मजेदार कमेंट केल्या आहेत. लोकांनी या व्हिडीओवर खूप वेगवेगळ्या मजेशीर कमेंट केल्या आहेत. काही चाहत्यांनी तिला काळजी घेण्याची विनंती देखील केली आहे.

प्रार्थना सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेमध्ये नेहाची भूमिका करत आहे. यापूर्वी अनेक चित्रपट आणि हिंदी मालिकांमध्ये प्रार्थनाने काम केले आहे. तिच्या नवऱ्याचं नाव अभिषेक जावकर आहे. अभिषेकचा देखील सिनेइंडस्ट्रीशी संबंध आहे. तो देखील लेखक, दिग्दर्शक, निर्माता आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!