Share

पुणेकरांना निर्बंधांमध्ये सूट मिळण्याच्या अपेक्षा वाढल्या; आज नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत आणखी घट

Published On: 

पुणे : या वर्षाच्या मार्च महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यासह देशात थैमान घातले होते. एप्रिल महिन्यात पुण्यातील स्थिती ही गंभीर बनली होती. दिवसाला सुमारे ७ ते ८ हजार नव्या कोरोना बाधितांची नोंद एकट्या पुणे शहरात केली गेली. यानंतर मे महिन्याच्या अखेरीस दुसरी लाट ओसरू लागली. सध्या दररोज सरासरी २०० ते ४०० कोरोना रुग्णांची नोंद पुणे शहरात केली जात आहे.

कोरोना संसर्ग हा कायम असून हा रोग पूर्णपणे नष्ट होईपर्यंत संकट हे कायम आहे. दरम्यान, पुणे शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने निर्बंधांमध्ये शिथिलता मिळावी अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ, व्यापारी संघटना आणि इतर नेत्यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रात्री ८ वाजेपर्यंत दुकाने खुली ठेवण्याचा आदेश जारी करण्यात येईल असं भाष्य केल्यामुळे आता पुणे शहराचा त्यात नंबर लागणार का ? हे महत्वाचं आहे.

दरम्यान, आज पुणे शहरात नव्याने १४२ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, २४३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या शहरात २ हजार ३०६ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु असून यातील २१८ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून ३४५ रुग्ण हे ऑक्सिजनच्या साहाय्याने उपचार घेत आहेत. आज एकूण ५ रुग्णांचा कोरोनाने दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

पुणेकरांना निर्बंधांमध्ये आता अधिक शिथिलता मिळण्याच्या अपेक्षेत वाढ झाली असून याबाबत महापौर मोहोळ म्हणाले, ‘पुण्याचा पॉझिटिव्हीटी रेट हा 5 टक्क्यांच्या खाली आहे, त्यामुळे शहर लेव्हल 2 मध्ये आहे, तरी शिथीलता दिली जात नाही. पुणे शहरात शिथीलता देण्यासंदर्भात मी गेल्या 15 दिवसांपासून सरकारकडे पाठपुरावा करतोय, मात्र त्यावर निर्णय का नाही माहीत नाही?’ असा सवाल त्यांनी राज्य सरकारला केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!