मुंबई : साधारणतः महाराष्ट्र राज्य बोर्डाचा प्रथम बारावी(HSC) आणि नंतर दहावीचा (SSC)चा निकाल जाहीर होतो. मात्र, यंदा दहावीचा निकाल आधी लागला असून बारावीच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी निकालाबाबत मोठी घोषणा केली आहे.
???? ???????????? ????????????????????????????????????????????????: The Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education will declare results of Std 12th, 2021 batch on 3rd August at 4pm. Best of luck to all students. #HSC #results #InternalAssessment @CMOMaharashtra @msbshse pic.twitter.com/kfNBZNGFyh
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) August 2, 2021
बारावीचा (HSC) निकाल उद्या म्हणजेच ३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ४ वाजता लागणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. आधीच्या वर्गातील कामगिरी, इतर अभ्यास व निकष यांच्या आधारे यंदाचे निकाल लावले जात आहेत. दहावीसाठी 30 टक्के, अकरावी साठी 30 टक्के आणि बारावीसाठी 40 टक्के अशी विभागणी केले असून यातून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाच्या बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून निकालाचे काम हे अंतिम टप्प्यात असल्याचं सांगण्यात येत होतं. आता अखेर उद्या बारावीचा निकाल हा खालील वेबसाइटवरून पाहता येणार आहे.
बारावीचा निकाल पाहण्यासाठीच्या वेबसाईट्स –
- http://www.mahresult.nic.in/
- https://hscresult.11 thadmission.org.in
- https://msbshse.co.in
- hscresult.mkcl.org
- www.mahresult.nic.in व https://msbshse.co.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाशिवाय इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.
बोर्डाने http://mh-hsc.ac.in या अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थ्यांचे रोल नंबर आणि सीट नंबर जारी केले आहेत. कोरोनामुळे बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे देण्यात आली नाहीत. आता विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी, बोर्डाने HSC रोल नंबर / सीट नंबर तपासण्यासाठी लिंक ऍक्टिव्ह केली आहे.
कसा मिळेल सीट नंबर ?
बैठक क्रमांक मिळवण्यासाठी तुम्हाला खालील सूचनांचे पालन करावे लागेल.
१) http://mh-hsc.ac.in या वेबसाईटवर जावा.
२) यानंतर तुमचा जिल्हा आणि तालुका निवडा.
३) त्यानंतर तुमचं संपूर्ण नाव आडनाव, तुमचं नाव, वडिलांचं नाव याप्रमाणं नमूद करावा.
४) संपूर्ण नाव वरील क्रमानुसार लिहिल्यानंतर सबमिट करा व तुम्हाला तुमचा सीट नंबर मिळेल.
महत्त्वाच्या बातम्या
- प्रत्येक यशस्वी ऑलिम्पिक मेडल विजेत्याच्या मागे पंतप्रधानांचा मोठ्ठा फोटो असतो; भाई जगताप यांची टीका
- ‘लांब फेकणारा खेळाडू टोकियोला गेला नाही, त्यामुळे भारताने गोल्डन संधी गमावली’, काँग्रेसचा टोला
- ‘शब्दांचे खेळ, भावनिक आवाहन, ड्रायव्हिंगशिवाय येतंय काय? मग शरद पवारांनी कौतूक केले कशाचे?’
- प्रत्येक यशस्वी ऑलिम्पिक मेडल विजेत्याच्या मागे पंतप्रधानांचा मोठ्ठा फोटो असतो; भाई जगताप यांची टीका
- …तोपर्यंत कोरोनापासून कुणीही सुरक्षित असणार नाही – आदित्य ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

