बीड : बीड जिल्ह्यात एक खळबळ उडवून देणारा प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यातील धारूरचे भाजपचे नगराध्यक्ष डॉ. स्वरूपसिंह हजारी यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १९ वर्षीय तरुणीची सोनोग्राफी करण्याचा बहाणा करत थेट सोनोग्राफी सेंटरमध्ये नेऊन डॉक्टरने तिच्यासोबत अश्लील चाळे केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. या प्रकरणी प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. स्वरुपसिंह हजारी यांच्याविरुद्ध धारूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकारने राजकीय आणि आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, डॉ. स्वरूपसिंह हजारी हे धारूर नगर पालिकेत विद्यमान नगराध्यक्ष पदावर आहे. तसेच स्त्रीरोगतज्ज्ञ असून धारूरमध्येच खासगी दवाखाना चालवतात. मंगळवारी दुपारी १९ वर्षाची गर्भवती तपासणीसाठी आली. तिला सोनोग्राफी करायची असा कारण सांगून सोनोग्राफी सेंटरमध्ये अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. तसेच जातीवाचक बोलला. हा प्रकार नातेवाईकांना सांगून गर्भवती थेट धारूर ठाण्यात पोहोचली. तक्रार दिल्यानंतर डॉ. हजारी विरोधात विनयभंग व अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
खोटा गुन्हा तत्काळ मागे घेण्याची मागणी
दरम्यान, स्थानिक डॉक्टर आणि व्यापारी असोसिएशनकडून हा गुन्हा खोटा असल्याचे सांगत तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी केली आहे. या गुन्ह्याविरोधात आज बुधवारी असोसिएशनच्या सर्व डॉक्टरांनी आपले हॉस्पिटल बंद ठेवले असून व्यापारी असोसिएशन सुद्धा बाजारपेठ कडकडीत बंद पुकारला आहे. तसेच हजारी यांच्या समर्थनाथ डॉक्टर संघटना आणि हजारी यांचे समर्थक आक्रमक होऊन रस्त्यावर उतरले आहेत. तर दुसरीकडे आरोपी डॉक्टरला तात्काळ अटक करावी, अशी मागणी काही सामाजिक संघटनांनी केली आहे. या प्रकरणात आरोपी डॉक्टर स्वरूपसिंह हजारी फरार आहेत सध्या धारूर शहरात तणावपूर्ण वातावरण आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना नियमावलीचं पालन करत तामिळनाडूसह दिल्लीमधील शाळा होणार सुरु
- दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
- ‘भास्कर जाधवच्या मुलाने मंदिरात अभिषेक केलेला चालतो, पण सामान्यांसाठी मंदिरे बंद’
- ‘तुमची बाहेर पडायला फाटते त्यात आमचा काय दोष’ ; उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
- गांधी परिवाराची बदनामी करणारा व्हिडिओ केल्याप्रकरणी पायल रोहतगी विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

