मुंबई : २०१८ मध्ये दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर बॉल टेम्परिंग प्रकरणानंतर क्रिकेट जगतात मोठी खळबळ उडाली होती. यानंतर ऑस्ट्रेलिया संघातील दोन खेळाडूंना एका वर्षाच्या बंदीला सामोरे जावे लागले. मात्र हे प्रकरण पुन्हा नव्याने चर्चेत आले आहे.
२०१८च्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यातील बॉल टेम्परिंग प्रकरणावर ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू कॅमेरुन बेनक्रॉफ्टने यांनी मोठे भाष्य केले आहे. ते म्हणाले की, ‘हे प्रकरण बॉल टेम्परींगचे होते मात्र या प्रकरणात कोणत्याही गोलंदाजावर काहीच कारवाई का झाली नाही. बॉल टेम्परींगचा प्रकार संघातील गोलंदाजाला माहित नसने हे न पटण्यासारखे आहे.’ असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणावर पुन्हा एकदा चौकशी होण्याची मागणी जोर धरू लागली आहे. याआधी २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियाचे तीन माजी क्रिकेटपटु इयान चॅपल, इयान हिली आणि मार्क टेलर बॉल टेम्परींग प्रकरणात सीएच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह लावले होते. या प्रकरणानंतर स्टिव्ह स्मिथ चे कर्णधार पद आणि डेव्हिड वॉर्नरचे उपकर्णधारपद काढुन टाकण्यात आले होते. तसेच दोघांवर एका वर्षाची बंदीही घालण्यात आली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राजीव सातव हे भारतीय राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा होते’
- ‘सातव यांच्या निधनाने महाराष्ट्रासह मराठवाड्याचे मोठे नुकसान’
- ‘बीसीसीआयने वेदाची साधी विचारपूसही केली नाही’ ; लिसा स्थळेकरची टीका
- ‘ज्यावेळी खरी गरज होती त्यावेळी ईश्वराने हात काढून घेतला’
- इंग्लंडच्या ‘या’ खेळाडूने व्यक्त केली उर्वरीत आयपीएल स्पर्धा खेळण्याची इच्छा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

