मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. यादरम्यान भारतात सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाल्याने स्पर्धा अनिश्चीत काळासाठी स्थगित करण्यात आली. उर्वरीत स्पर्धा पुन्हा कधी आणि कुठे आयोजीत करण्यात येईल याबाबत अजुनही प्रश्नचिन्ह आहे.
मात्र यादरम्यान इंग्लंडचा आघाडीचा गोलंदाज जोफ्रा आर्चरने आयपीएल स्पर्धा खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आयपीएल २०२१ स्पर्धेत दुखापतीमुळे तो खेळू शकला नव्हता. मात्र आर्चर आता दुखापतीतून पुर्णपणे सावरला आहे. नुकत्याच त्याने दिलेल्या एका मुलाखतीत त्याने हा खुलासा केला. यावेळी बोलताना तो म्हणाला की, ‘आयपीएल स्पर्धेचे उर्वरित सामने झाले तर मला नक्कीच खेळायला आवडेल.’ असे म्हणाला.
आयपीएल स्पर्धा ज्यावेळी सुरु झाली होती त्यावेळी आर्चर दुखापतीमुळे स्पर्धा खेळु शकला नव्हता मात्र आता तो दुखापतीतुन पुर्णपणे सावरला आहे. यानंतर त्याने इंग्लंडमध्ये काउंटी चॅम्पियनशीप स्पर्धेमध्ये जोरदार पुनरागमन करत १३ षटकात २९ धावा देत २ गडी बाद केले होते. आयपीएलमध्ये आर्चर हा राजस्थान रॉयल्स संघाकडून ३ वर्षापासुन खेळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- छत्रपती संभाजी महाराजांवरील ‘शिवपुत्र संभाजी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला….
- ‘माझ्या मुलीला कोणी असं किस केलं तर मी त्याचे ओठ चिरुन टाकेन’; शाहरुखने दिला इशारा
- दिलासा! देशात २ महिन्यांत आणखी काही लसी उपलब्ध होणार
- रेमडेसिवीर इंजेक्शनला चक्क रेमो डिसूजा म्हणणाऱ्या मुलाचा व्हिडिओ व्हायरल…
- ‘राजीव तु हे काय केलेस, तुला श्रध्दांजली कोणत्या शब्दात वाहू ?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

