Share

‘बीसीसीआयने वेदाची साधी विचारपूसही केली नाही’ ; लिसा स्थळेकरची टीका

Published On: 

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या या लाटीत अनेक मान्यवरांना या विषाणुची लागण झाली आहे. या काळात अनेक रुग्णांना अपुऱ्या औषधामुळे आपला जिव गमवावा लागत आहे. तसेच अपुऱ्या ऑक्सिजनमुळेही अनेक रुग्णांना जिव गमवावा लागत आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघाची सदस्य असलेली वेदा कृष्णुमुर्तीची आई चेलूवंबदा देवी यांचे कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निधन झाले होते. ही माहीती स्वतः वेदा कृष्णमूर्तीने ट्विट करुन दिली होती. आईच्या दु:खातुन सावरण्याआधीच वेदाला दुसरा धक्का बसला. तिच्या बहिणीचेही कोरोनामुळे निधन झाले. वेदाने स्वत: ट्विट करुन ही माहिती दिली. या ट्विटमध्ये ती म्हणाली, ’मोठ्या दु:खद अंतकरणाने मला आणि माझ्या कुटुंबाला माझी लाडकी बहिण अक्काला निरोप द्यावा लागला. माझे जग असलेली बहिण काळाच्या पडद्याआड गेली. या कठीण काळात तुम्ही केलेल्या प्रार्थनेबद्दल सर्वाचे आभार. तुम्ही ज्यांच्यावर जिवापाड प्रेम करता त्यांना आत्ताच घट्ट धरुन ठेवा आणि सुरक्षित रहा’ असे ट्विट तिने केले होते.

करोनामुळे बहीण आणि आई गमावल्यानंतर आपली इंग्लंड दौऱ्यासाठी निवड करू नये, अशी विनंती करणाऱ्या वेदा कृष्णमूर्तीची साधी विचारपूसही न केल्याबद्दल ऑस्ट्रेलिया महिला संघाची माजी कर्णधार लिसा स्थळेकरने भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (बीसीसीआय) टीका केली आहे.

‘‘वेदाची ‘बीसीसीआय’ने साधी विचारपूसही केली नाही, याचा मला सर्वात जास्त राग आला. हा आघात ती कसा सहन करतेय, याचीही पर्वा त्यांना नाही. संघटना फक्त खेळाचा नव्हे तर खेळाडूचाही सर्वार्थाने विचार करते. त्यामुळे मी निराश आहे,’’ असे स्थळेकरने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!