Share

नर्सिंग ‘एएनएम’ अभ्यासक्रमांची उद्यापासून परीक्षा; मराठवाड्यातील २० केंद्रावर बैठक व्यवस्था

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी ऑक्सिलारी नर्सिंग मिडवाइफरी तथा सहायक नर्सिंग मिडवाइफरी (एएनएम) अंतिम वर्षाची परीक्षा राज्यात ५ ऑक्टोबरपासून होणार आहे. मराठवाड्यातील १५० नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी २० केंद्रांवर परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी ३ हजार १७२ विद्यार्थिनींनी नोंदणी केली आहे.

परीक्षा उत्तीर्ण होताच विद्यार्थिनी रुग्ण सेवेसाठी सज्ज होणार आहे. कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा महत्वपूर्ण असल्याचे महाराष्ट्र राज्य खाजगी नर्सिंग स्कूल- कॉलेज मॅनेजमेंट असोसिएशनचे राज्य सचिव शंकरराव आडसूळ यांनी सांगितले. कोरोनाच्या संकटानंतर नर्सेसच्या मागणीत वाढ झाल्याने ‘एएनएम’ या नर्सिंग अभ्यासक्रमाकडे विद्यार्थिनींचा ओढा वाढत चालला आहे. आकर्षक वेतन आणि पूरक सोयी सुविधा उपलब्ध होत असल्याने या क्षेत्रात करियर करणे हा यशाचा राजमार्ग ठरू शकत असल्याचे शिक्षण तज्ञांचे म्हणणे आहे.

जुलै- ऑगस्ट महिन्यात होणारी अंतिम वर्ष अभ्यासक्रमाची ‘एएनएम’ परीक्षा कोरोना संसर्गामुळे आत ५ ते ६ ऑक्टोबरला घेण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत राज्यातील ८५ केंद्रांवर ४९८ महाविद्यालयातील १० हजार ३५० विद्यार्थिनींनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. यात मराठवाड्यातील १५० महाविद्यालयातील ३ हजार १७२ विद्यार्थिनींचा समावेश आहे. मराठवाड्यातील परीक्षार्थींनींची बैठक व्यवस्था २० परीक्षा केंद्रांवर करण्यात आली आहे. दरम्यान, कोरोनाच्या संकटानंतर आरोग्य सेवेत नर्सेसची मागणी वाढल्यानंतर होणारी ही पहिलीच परीक्षा असल्याने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींचा भविष्यात फायदा होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!