मुंबई : आयकर विभागाने मुंबईत दोन रिअल इस्टेटचा व्यवसाय करणाऱ्यांवर छापेमारी केली आहे. तसेच अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवरही छापे मारण्यात आले असून त्यांच्याकडून आयकर विभागाने 184 कोटी रुपयाची बेहिशोबी मालमत्ता जप्त केल्याची माहिती ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेने दिली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
आयकर विभागाच्या सीबीडीटी विभागाने ही माहिती दिली आहे. मुंबई, पुणे, बारामती, गोवा आणि जयपूर येथील 70 ठिकाणी आयकर विभागाने धाडी मारल्या. 7 ऑक्टोबर रोजी हे छापे मारण्यात आले. या छापेमारीत बेहिशोबी मालमत्ता आणि काळा पैसा जप्त करण्यात आल्याचं म्हटलं आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही सीबीडीटीच्या या प्रेस रिलीजच्या आधारे अजित पवारांच्या संबंधितांचे 184 कोटी रुपये जप्त केल्याचा दावा केला आहे.
‘7 ऑक्टोबर 2021 पासुन विविध ठिकाणी धाडसत्र करण्यात आलं. मुंबई, पुणे, बारामती, गोवा आणि जयपूर येथे जवळपास 70 ठिकाणांवर ही छापेमारी करण्यात आली होती’,असं सीबीडीटीने शुक्रवारी दिलेल्या माहितीमध्ये सांगितलं आहे.
दोन रिअल इस्टेट उद्योगांच्या कार्यालयावर आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्ती, संस्थांवर छापेमारी करण्यात आली. झाडाझडती दरम्यान बेहिशेबी आणि बेनामी आर्तिक व्यवहारांचा खुलासा झाला आहे. काही संशयास्पद व्यवहार, कागदपत्रे आढळून आले आहेत. तसेच या दोन्ही ग्रुप्सच्या जवळपास 184 कोटी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्तेचा खुलासा झाला आहे, असंही सीबीडीटीने सांगितलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- उद्धव ठाकरेंचा दसऱ्यादिवशीच शिमगा, शेतकऱ्यांविषयी एकही शब्द काढला नाही- चंद्रकांत पाटील
- ‘उद्धव ठाकरेंच्या मेव्हण्याची बेनामी कंपन्यात गुंतवणूक असेल तर त्याचं उत्तर मुख्यमंत्र्यांना द्यावंच लागेल’
- ‘घराबाहेर पडून ते शेताच्या बांधावर गेले असते तर शेतकरी कसा उद्धवस्त झाला आहे याची जाणीव झाली असती’
- ‘मुख्यमंत्र्यांचे भाषण म्हणजे गरम पाण्याच्या नावाखाली नुसतंच कोमट पाणी’ : संदीप देशपांडे
- ठरलं तर मगं…राहुल द्रविड होणार टीम इंडियाचा कोच!


