औरंगाबाद : मराठवाड्याच्या राजकारणातील कायम चर्चेत राहिलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे हर्षवर्धन जाधव आहेत. आता त्यांनी आपले सासरे रावसाहेब दानवेंना खुले चॅलेंज केलं आहे. पुढच्या निवडणुकीत रावसाहेब दानवेंना घरी बसवलं नाही, तर मी माझ्या बापाची अवलाद नाही, अशी घणाघाती टीका हर्षवर्धन जाधव यांनी केली आहे.
रावसाहेब दानवे विरुद्ध हर्षवर्धन जाधव यांच्यातील संघर्ष अनेकदा समोर आला आहे. पुण्यातील मारहाणीच्या घटनेत रावसाहेब दानवे यांनी राजकीय दबावाचा वापर करून गुन्हे दाखल केल्याचा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. त्या प्रकरणात हर्षवर्धन जाधव यांना जामीन मिळाला होता. परंतु उच्च न्यायालयाने त्यावेळी म्हटलं होतं की, राजकीय दबावामुळे गुन्हा दाखल करण्यात आला, असा दावा हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. यानंतर आक्रमक होत हर्षवर्धन जाधवांनी या प्रकरणात राज्य सरकारने लक्ष घालण्याची मागणी केली. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही लक्ष घालावं, अशी मागणी केली आहे.
अनेक वेळा वादग्रस्त कारणांमुळे चर्चेत राहिलेल्या हर्षवर्धन जाधव यांचा कन्नड हा विधानसभा मतदारसंघ. आमदार पदावर असताना पोलिसांशी हुज्जत घालण्यामुळे झालेली मारहाण असो, मराठा आरक्षणप्रश्नी दिलेला राजीनामा असो, निवडणुकीच्या चंद्रकांत खैरेंवर तिखट शब्दांत हल्ला असो किंवा नुकतेच झालेले पुणे येथील मारहाणीचे प्रकरण असो, कायम या ना त्या विषयामुळे ते चर्चेत राहतात. दरम्यान, हर्षवर्धन जाधवांनी काही काळापूर्वीच फेसबुक लाइव्ह करून सासरे दानवे यांच्याकडून होत असलेल्या त्रासाची माहिती दिली होती. यावेळी त्यांनी प्रथमच समाज माध्यमावर पत्नीशी बेबनाव झाल्याचे जाहीर केले होते.
महत्वाच्या बातम्या
- ‘पवारांचा जन्मच पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहण्यात जाणार ही मात्र काळ्या दगडावरची पांढरी रेघ’
- ‘गेली तीन दशके पवार साहेब चार खासदारांच्या बळावर पंतप्रधान पदाची स्वप्न बघत आहे’
- ‘अनिल देशमुखांना कोरोना झालाय, त्याचा परिणाम मेंदूवरही होतो म्हणे’
- ‘न्यायव्यवस्थेतील वातावरण शंका-कुशंका घेण्याच्या पलीकडे पोहोचले आहे’
- ‘शी जिनपिंगच्या शरीरात डेमोक्रॅटिकमधला ‘डी’ सुद्धा नाही’ भारतासाठी जो बायडन यांचे विधान महत्वाचे !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

