मुंबई : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा आज 19वा दिवस आहे. आता लवकरच या आंदोलनावर तोडगा निघू शकतो, अशी शक्यता वर्तवली आज आहे. मात्र, 18 दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनाने आता आक्रमक स्वरूप धारण केले आहे. नव्या जाचक कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन तीव्र आणि देशव्यापी करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला असून रविवारी सकाळी ‘चलो दिल्ली’ आंदोलन, तर सोमवारी प्रमुख शेतकरी नेते उपोषण करणार आहेत. आम्ही सरकारशी चर्चेस तयार आहोत; मात्र आधी तिन्ही नवे कृषी कायदे रद्द करण्याबाबत चर्चा होईल, असे शेतकऱ्यांच्या नेत्यांनी सांगितले आहे.
मात्र दुसरीकडे रयत क्रांती संघटनेचे सर्वेसर्वा आणि माजी कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी या कायद्यांचे समर्थन केले असून सोमवारी राज्यभर रयत क्रांती संघटना कृषी कायद्यांना अभिषेक घालणार आहे. राजकीय स्वार्थापोटी काही पक्षांकडून शेतकर्यांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. त्यातूनच या कायद्यांना लागलेली दृष्ट, वाईट भावना दूर व्हाव्यात, अशी आमची भावना आहे. यासाठी सोमवार 14 डिसेंबर रोजी संपूर्ण राज्यभरात रयत क्रांती संघटनेच्यावतीने कृषी कायद्यांना अभिषेक घालण्यात येणार आहे, अशी माहिती सदाभाऊ खोत यांनी दिली.
केंद्र सरकारनं मंजूर केलेले कायदे शेतकर्यांच्या जीवनात क्रांती आणणारे आहेत. हे कायदे शेतकर्यांच्या हिताचे असून गेली सत्तर वर्ष भांडवलशाही व्यवस्थेत खितपत पडलेल्या शेतकर्यांच्या बाजूचे आहेत. या विधेयकामुळे शेतकर्यांना हमीभाव मिळण्याबरोबरच शेतीमाल साठवणूकीच्या बंधनातून मुक्तता होणार असल्याचे माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- पवार साहेबांनी विश्वास टाकला नसता तर तुम्हाला धनंजय मुंडे इथं दिसला नसता
- विधान परिषदेवरील नामनिर्देशित सदस्यांच्या नावांची घोषणा होण्याआधी विरोध चुकीचा : कुंभकोणी
- …अन्यथा रद्द होऊ शकत तुमचं रेशन कार्ड; केंद्र सरकारचा रेशन कार्डबाबत महत्त्वाचा निर्णय !
- ‘स्वातंत्र्याच्या ७३ वर्षानंतर देखील भाजपने आपल्या खासदारांना संविधानाचे शिक्षणच दिले नाही’
- औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बाळासाहेबांच्या इच्छेप्रमाणे संभाजीनगर कधी होणार?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

