Share

औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बाळासाहेबांच्या इच्छेप्रमाणे संभाजीनगर कधी होणार?

Published On: 

औरंगाबाद – मला विकास कामांची घाई झाली आहे. औरंगाबादचा विकास वेगाने करायचा आहे. केवळ भूमिपूजन करून कुदळ मारायला आलेलो नाही. काम पूर्ण करायला आलोय, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादमध्ये म्हणाले. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी शेलक्या शब्दात टीका केल्याने पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगताना पाहायला मिळत आहे.

काल औरंगाबादच्या चिखलठाणा येथील गरवारे क्रीडा संकुल येथे मनपाच्या औरंगाबाद शहर पाणीपुरवठा योजनेचे प्रत्यक्ष भूमिपूजन आणि आभासी पद्धतीने हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृतीवन आणि स्मारक भूमिपूजन, जंगल सफारी पार्क भूमिपूजन, शहरातील विविध रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला. यावेळी बोलताना ठाकरे यांनी विरोधकांना देखील चिमटे काढले.

मुख्यमंत्री म्हणाले,‘घरी बसून केलेल्या कामांचा शुभारंभ आणि भूमीपुजन आता होतेय. त्याची सुरवात औरंगाबाद म्हणून झाली,’ असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे. तर, ‘मला विकास कामांची घाई झाली आहे. औरंगाबादचा विकास वेगानं करायचा आहे. फक्त भूमिपूजन करुन कुदळ मारायला आलेलो नाहीये. काम पूर्ण करायला आलोय,’ असं आश्वासन देखील त्यांनी यावेळी जनतेला दिलं आहे.

यावर मुख्यमंत्री म्हणून ते तुमचे कामच आहे, तुम्ही लोकांवर मेहेरबानी करत नाही. औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बाळासाहेबांच्या इच्छेनुसार संभाजीनगर कधी होणार? ते पण सांगून टाका, असे ट्विट राणे यांनी केले आहे.

याला प्रत्युत्तर देताना राणे आपल्या पोस्ट मध्ये म्हणाले, मुख्यमंत्री म्हणून ते तुमचं कामचं आहे, तुम्ही लोकांवर मेहेरबानी करत नाही. तुम्ही कुदळ नाही फावडा मारता आम्हाला माहीत आहे, असो.. कधी न्हवे ते मुंबईच्या बाहेर गेलाच आहात तर त्या जिल्ह्याचं नाव स्वा. बाळासाहेबांच्या इच्छे नुसार संभाजीनगर कधी होणार ते पण हिम्मत असेल तर सांगून टाका.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!