Share

‘देशमुखांच्या निवासस्थान आणि कार्यालयात पुरावे नष्ट करण्याचे काम सुरू आहे’

Published On: 

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या 100 कोटी रुपये वसुलीच्या कथित आरोपाप्रकरणी हायकोर्टात आज सुनावणी घेण्यात आली. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांची सीबीआयने 15 दिवसात प्राथमिक चौकशी करावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

मुंबई उच्च न्यायालयात परमबीर सिंह यांच्यासोबत वकील जयश्री पाटील यांनीदेखील याचिका केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांच्यासहित दाखल इतर दोन जनहित याचिका फेटाळून लावत वकील जयश्री पाटील यांच्या याचिकेवर हे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाने असं सांगितलं की, अनिल देशमुख हे गृहमंत्री पदावर असल्याने पोलिसांकडून या प्रकरणाचा निष्पक्ष तपास होण्याची शक्यता कमी असल्याने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात येत आहे.

अखेर, अनिल देशमुख हे राजीनामा देणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. ‘देशमुख आपला राजीनामा सोपवण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गेले आहेत. न्यायालयाने सीबीआय चौकशी नेमल्यामुळे राजीनामा देण्याची तयारी स्वतः अनिल देशमुख यांनी शरद पवार यांच्याकडे दर्शवली होती. शरद पवार यांनी देखील राजीनाम्याला होकार दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील हा राजीनामा मंजूर करतील,’ अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.

अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावर आता विरोधी पक्षातील विविध नेत्यांची प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झालेली आहे. भाजपचे नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीट करून अनिल देशमुख यांच्यावर काही गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहे. ‘मी अत्यंत जबाबदारीने सांगू इच्छितो की नुकताच राजीनामा दिलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या शासकीय निवासस्थान आणि कार्यालयात असलेले 100 कोटीच्या प्रकरणा संदर्भातील पुरावे नष्ट करण्याचे काम सुरू आहे. CBIने तातडीने आवश्यक कारवाई करावी.’ अशी मागणी त्यांनी केलेली आहे.

दरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी होणार असल्याने अखेर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. देशमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले असून मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देणार आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!