Share

शिवसेना-राष्ट्रवादी झाली आता…भाजपचा महाविकास आघाडीला टोला

Published On: 

मुंबई : अखेर गृहमंत्री अनिल देशमुख हे राजीनामा देणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. ‘देशमुख आपला राजीनामा सोपवण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गेले आहेत. न्यायालयाने सीबीआय चौकशी नेमल्यामुळे राजीनामा देण्याची तयारी स्वतः अनिल देशमुख यांनी शरद पवार यांच्याकडे दर्शवली होती. शरद पवार यांनी देखील राजीनाम्याला होकार दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील हा राजीनामा मंजूर करतील,’ अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.

भाजपने विविध प्रकरणांवरून अनिल देशमुखांच्या राजीनाम्यासाठी गेले काही महिने अक्षरशः रान उठवले होते. आता अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावर विविध नेते आपली प्रतिक्रिया देत आहेत. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी देखील महाविकास आघाडीला लक्ष्य केलं आहे. ‘शिवसेना झाल राष्ट्रवादी झाले आता राज्यातील महाआघाडी सरकारमधील किमान समान कार्यक्रम म्हणून काँग्रेसला देखील तिसऱ्या विकेटसाठी संधी मिळायला हवी. काँग्रेसवर अन्याय होता कामा नये…’ असा टोला केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडीसह काँग्रेसला लगावला आहे.

अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी होणार !

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या 100 कोटी रुपये वसुलीच्या कथित आरोपाप्रकरणी हायकोर्टात आज सुनावणी घेण्यात आली. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांची सीबीआयने 15 दिवसात प्राथमिक चौकशी करावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

मुंबई उच्च न्यायालयात परमबीर सिंह यांच्यासोबत वकील जयश्री पाटील यांनीदेखील याचिका केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांच्यासहित दाखल इतर दोन जनहित याचिका फेटाळून लावत वकील जयश्री पाटील यांच्या याचिकेवर हे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाने असं सांगितलं की, अनिल देशमुख हे गृहमंत्री पदावर असल्याने पोलिसांकडून या प्रकरणाचा निष्पक्ष तपास होण्याची शक्यता कमी असल्याने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!