Share

आपण अद्याप कोरोनामुक्त नाही; प्रत्येकाने स्वत:ची काळजी घ्यावी : आ. संतोष दानवे

Published On: 

जाफराबाद : आपण पूर्णपणे कोरोनामुक्त झालेलो नसून प्रत्येकाने स्वतःची आणि इतरांची काळजी घ्यावी, असे प्रतिपादन आमदार संतोष दानवे यांनी केले आहे. दानवे यांनी आमदार निधीतुन ग्रामीण रुग्णालयास रुग्णवाहिका दिली आहे. या रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

कोरोना महामारीच्या काळात संपूर्ण जगभरात डॉक्टर हेच देव होते. परिस्थिती व्यवस्थित हाताळल्याने आज आपण कोरोनाच्या परिस्थितीतुन सावरत आहोत. मात्र, अजूनही आपण पूर्णपणे कोरोनामुक्त झालेलो नाही. त्यामुळे सर्वांनी स्वतःची आणि इतरांची काळजी घेण्यीच गरज असल्याचे यावेळी आमदार संतोष दानवे यांनी सांगितले.

पुढे बोलताना आमदार संतोष दानवे यांनी सांगितले की, तालुक्यातील १०० गावांपैकी ७७ गावांमध्ये रस्त्यांची कामे झाली आहेत. तर अनेक गावांमध्ये कामे प्रगतीपथावर सुरु आहे. संपूर्ण मतदारसंघात रस्त्याचे जाळे विनल्या जात आहे. यामध्ये टेभुर्णी माहोरा, अकोलादेव, वरुड बु. , कुंभारझरी यासह विविध सर्कल मधील गावांचा समावेश आहे. तसचे व्यायाम शाळा, वीज, रोहित्र, पाणी आडवा पाणी जिरवा, जलशिवार योजनेसह विकासकामे तालुक्यात केली असुन अनेक कामे सुरु असल्याचे यावेळी बोलताना संतोष दानवे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!